दुबई – नवोदित देवदत्त पडीक्कल व मिस्टर 360 एबी डीविलियर्स यांनी फटकावलेल्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर बेंगळुरू संघाने सनरायझर्स हैदराबादसमोर विजयासाठी 164 धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर यजुर्वेद्र चहल आणि नवदीप सैनी यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने सनरायझर्स हैदराबाद संघाचा 10 धावांनी पराभव करत आयपीएल स्पर्धेत विजयी सलामी दिली.
या सामन्यात केरळचा प्रथम दर्जाचा क्रिकेटपटू देवदत्त पडीक्कल याला रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाने ऍरन फिंचच्या साथीत सलामीला पाठवले तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, त्याने सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजीचा पालापाचोळा करत 42 चेंडूत 8 चौकार फटकावून 56 धावांची खेळी केली व या एकाच खेळीत त्याचे नाव देशभरात पोहोचले.
देवदत्त पडीक्कलचा आयपीएलपर्यंतचा प्रवास…
- बल्लारी टस्कर्सकडून पदार्पण
- कर्नाटक प्रीमिअर लीगमधून प्रकाशझोतात
- पहिल्याच डावात 53 चेंडूत 72 धावा
- कूचबिहार स्पर्धेत 829 धावा
- हजारे स्पर्धा व श्रीलंका दौऱ्यामुळे चर्चेत
- सौराष्ट्र व गोव्याविरुद्ध शतकी खेळी
- संपूर्ण हजारे स्पर्धेत 609 धावा
- क्रिकेट समीक्षकांकडून कौतुक
- आरसीबी संघाकडून लिलावात खरेदी