#IPL2019 : रसेल खेळण्याबाबत संदिग्धता

कोलकाता – आयपीएलच्या बाराव्या सत्रात गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या चेन्नई सुपर किंग्जला दिल्ली कॅपिटल्सप्रमाणेच कोलकाता नाइट रायडर्सवर सलग दुसरा विजय हवा आहे. हा सामना रविवारी ईडन गार्डनवर रंगणार आहे. घरच्या मैदानावर सलग दोन पराभव झाल्याने कोलकाता नाईट रायडर्स संघावर दबाव राहणार आहे.

दरम्यान, कोलकाताच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. केकेआरचा ऑलराउंडर आंद्रे रसेल आज होणा-या सामन्यात खेळण्याची शक्‍यता कमी आहे. चेन्नईविरुद्ध झालेल्या सामन्यात रसेल जखमी झाला होता. त्यामुळे दिल्लीसोबतच्या सामन्यातही तो चांगला खेळ करू शकला नाही. तो मैदानात अनेक वेळा लंगडता दिसला होता.

केकेआरच्या चार विजयापैकी तीन विजयाचा रसेल शिल्पकार ठरलेला आहे. त्याच्या उपलब्धतेबाबत कर्णधार दिनेश कार्तिक म्हणाला, रसेलची दुखापत जास्त गंभीर नसल्याने तो सामन्यात खेळू शकेल. पण त्याबाबतचा निर्णय उद्याच घेण्यात येईल, असे सांगितले. या सत्रात रसेलने केकेआरकडून सहा डावांत 40 धावांपेक्षा अधिक खेळी केली असून तो न खेळल्यास संघाला मोठा धक्‍का बसेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.