मुंबई -आयपीएल स्पर्धेत यंदा विजेतेपद मिळवण्यो मुंबई इंडियन्स संघाचे स्वप्न भंग झाले. या पराभवाला मुख्यत्वे कारणीभूत असलेल्या तब्बल चार खेळाडूंना मुंबई इंडियन्सचे व्यवस्थापन नारळ देणार आहे. यंदाच्या स्पधेर्या क्वॉलिफायर 2 फेरीत गुजरात टायटन्सने मुंबईला पराभूत करत दुसऱ्यांदा अंतिम फेरीत स्थान मिळवले. मुंबई इंडियन्सचा पराभव व्यवस्थापनाच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे मुंबईच्या चार खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला जाणार असल्याचे सांगितले आहे.
या चार खेळाडूंमध्ये ख्रिस जॉर्डन, ह्तिक शोकिन, आर्शद खान व ड्वेन जॉन्सन यांचा समावेश आहे. जोफ्रा आर्चर जखमी झाल्यानंतर ख्रिस जॉर्डनची संघात निवड करण्यात आली होती. डेथ ओव्हरमध्ये मुंबईला त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. मात्र त्याच्याकडून अपेक्षा भंग झाला. शोकीनने 2022 सालच्या स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. त्यामुळेच त्याला यंदाही पुन्हा एकदा संधी मिळाली.
पण आठ सामन्यात त्याने 23 धावा देत फक्त तीन गडी बाद केले. मुंबई इंडियन्सला आर्शद खानकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. त्याने नेट प्रॅक्टिसमध्ये चांगलाच घाम गाळला. पण अनकॅप्ड प्लेयर आपली छाप सोडू शकला नाही. सहा सामन्यात 13.14 च्या इकोनॉमी रेटने त्याने 5 गडी बाद केले आहे.
ड्वेन जॉन्सनला मुंबई इंडियन्स रिलीज करण्याची शक्यता आहे. त्याने मुंबईसाठी फक्त एक सामना खेळला आहे. त्याने चार षटकात 1 गडी बाद करून 53 धावा दिल्या आहेत. यंदाच्या मोसमात आलेल्या अपयशामुळे मुंबई इंडियन्स पुढील मोसमासाठीच्या लिलावात असे खेळाडू निवडणार आहे जे यंदा सातत्यपूर्ण कामगिरी करतील. तरच त्यांच्यावर बोली लावली जाणार आहे.