IPL 2024, CSK vs RCB :- आयपीएल 2024 चा पहिला सामना आज (22 मार्च) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल, ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. यापूर्वी आयपीएल 2019 मध्ये देखील सीएसके विरुद्ध आरसीबी सामन्याने हंगामाची सुरुवात झाली होती, ज्यामध्ये चेन्नईने 7 गडी राखून विजय मिळवला होता.
यावेळी, विशेषत: चेन्नईसाठी एक नवीन आव्हान असेल कारण संघाचे कर्णधारपद एमएस धोनीच्या हातात नाही तर ऋतुराज गायकवाडच्या हातात असेल. दुसरीकडे, डब्ल्यूपीएल 2024 मध्ये आरसीबी महिला संघाच्या विजेतेपदानंतर फाफ डू प्लेसिस आणि त्याच्या संघावरही विजेतेपद मिळवण्याचा आयपीएलमध्ये दबाव असेल.
IPL 2024 : कोहली ऐतिहासिक विक्रमाच्या जवळ, चेन्नईविरुद्ध फक्त 6 धावांची गरज…
नवीन नाव-नवीन जर्सीसह मैदानात उतरणार आरसीबी…
आयपीएल 2024 च्या काही दिवस आधी, RCB ने एक अनबॉक्स इव्हेंट आयोजित केला होता, ज्यामध्ये टीमला फक्त नवीन नाव मिळाले नाही तर यावेळी टीम नवीन जर्सी घालून खेळताना दिसणार आहे. पूर्वी RCB ‘रॉयल चॅलेंजर्स बंगलोर’ म्हणून ओळखले जात होते,परंतु इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामात विराट कोहलीचा संघ ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’ ( Royal Challengers Bengaluru ) म्हणून ओळखला जाईल. पूर्वी RCB संघाच्या जर्सीचे कॉम्बिनेशन लाल आणि काळा असे होते, पण आता जर्सीवर काळ्याऐवजी निळा रंग असेल.
CSK च्या बाजूने रेकॉर्ड…
आयपीएलमधील आतापर्यंतच्या विक्रमांबद्दल बोलायचे झाले तर चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 31 वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी सीएसकेने 20 वेळा विजय मिळवला आहे आणि RCB फक्त 10 वेळा जिंकू शकला आहे आणि त्यांचा एक सामना अनिर्णित राहिला. चेन्नई कागदावर मजबूत दिसत आहे आणि जर आपण बारकाईने पाहिले तर आरसीबीला आयपीएल 2024 मध्ये गोलंदाजीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. एकूणच, चेन्नईचे संयोजन अधिक चांगले दिसत आहे, त्यामुळे बंगळुरूला विजयासह हंगामाची सुरुवात करणे सोपं असणार नाही.