Arvind Kejriwal arrested – गुरुवारी उशिरा घडलेल्या घडामोडीत, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात अटक केली.
लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाच केजरीवाल यांना अटक झाल्याने, लोकसभा निवडणुकीत आपचे नेतृत्व कोण करणार असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यासोबतच आम आदमी पक्षाला दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाला बसवायचं हा प्रश्न देखील सोडवावा लागणार आहे.
केजरीवाल यांच्या जागी तीन नेत्यांच्या नावाची चर्चा
केजरीवाल यांच्या अटकेनंतर त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल, कॅबिनेट मंत्री आतिशी, सौरभ भारद्वाज या तीन नावांची चर्चा आहे. असं असलं तरी, दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून जवळपास १० वर्षांची कारकीर्द, आम आदमी पक्षाचा प्रमुख चेहरा असलेल्या केजरीवाल यांच्या जवळपास जाणारा नेता निवडणं आम आदमी पक्षासाठी अवघड असणार आहे. यातही भर म्हणजे, लोकसभा निवडणुकांची उलटी गिनती सुरु झाली असताना आम आदमी पक्षाला ही निवड करावी लागणार आहे.
पंजाब, दिल्ली, गुजरात, आसाम आणि हरियाणा येथील लोकसभा निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवाल यांच्यावर पक्षाचे प्रमुख प्रचारकाची जबाबदारी होती.
केजरीवाल यांच्या पत्नीच्या नावाची चर्चा | arvind kejriwal arrested
अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्या नावाची देखी चर्चा सुरु आहे. त्या माजी महसूल अधिकारी आहेत. केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री व लोकसभा निवडणुकांच्या स्टार प्रचारक म्हणून सुनीता यांच्याकडे पाहिले जात आहे.
केजरीवालांच्या विश्वासू आतिशी
दिल्ली सरकारमध्ये शिक्षण, वित्त, पीडब्ल्यूडी, महसूल आणि सेवा अशा सर्वाधिक खात्यांची जबाबदारी आतिशी यांच्यावर आहे. अरविंद केजरीवाल यांच्या त्या विश्वासू मानल्या जातात.
त्या पक्षाच्या प्रवक्त्या देखील आहेत, आप सरकार आणि अरविंद केजरीवाल यांचा बचाव करणारा चेहरा म्हणून त्या माध्यमांवर देखील झळकतात.
सौरभ भारद्वाज यांचेही नाव चर्चेत | arvind kejriwal arrested
सौरभ भारद्वाज हे देखील दिल्ली सरकारमधील एक महत्वाचे नाव असून त्यांच्याकडे आरोग्य आणि शहरी विकास यासह अनेक महत्त्वाच्या खात्यांचा समावेश आहे. केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर त्यांचे नाव देखील बदली मुख्यमंत्री म्हणून चर्चेत आलं आहे.
‘मैं भी केजरीवाल…’
गतवर्षी डिसेंबरमध्ये आम आदमी पक्षाने, अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यास मुख्यमंत्री म्हणून अन्य नेत्याची निवड करायची की सत्तेच्या चाव्या केजरीवाल यांच्याकडेच ठेऊन त्यांना तुरुंगातून राज्यकारभार चालवू द्यायचा असा प्रश्न विचारण्यात आला होता.
याबाबत आम आदमी पक्षाचे आमदार, दिल्ली महापालिकेतील नगरसेवक यांचीही मते घेण्यात आली होती.