BJP 4th list | Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकाची रणधुमाळी सुरू झाली असून भाजपने काल गुरुवारी (दि. 21) आपली तिसरी यादी जाहीर केली आहे. या तिसऱ्या यादीमध्ये एकूण नऊ उमेदवार असून सर्व तमिळनाडू राज्यातील आहेत. तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. आण्णामलाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तर चेन्नई साऊथमधून टी सुंदरराजन, चेन्नई सेंट्रलमधून विनोज पी सेल्वन, वेल्लूरमधून ए. सी. शानमुगन, कृष्णगिरी मतदारसंघातून सी. नरसिम्हा, निलगिरी या राखीव मतदारसंघातून एल मुरुगन, पेरांबलूरमधून टी. आर. पेरिवेंदर, थुथूकुडीमधून नैनार नेगंद्रन, कन्याकुमारीतून पोन राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. BJP 4th list | Lok Sabha Election 2024 ।
भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत 276 उमेदवारांची नावे जाहीर केली. सर्वप्रथम 195 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यानंतर पक्षाकडून 72 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. तर काल गुरुवारी (दि. 21) 9 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे.
दरम्यान, अश्यातच आता पक्षाने आपली चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 15 जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याही यादीत महाराष्ट्रातील एकाही जागेचा समावेश नाही. भाजपच्या या चौथ्या यादीत पुदूच्चेरी तसेच तमिळनाडू राज्यातील 14 जागांचा समावेश आहे. BJP 4th list | Lok Sabha Election 2024 ।
BJP releases the 4th list of the Lok Sabha Candidates from Puducherry and Tamil Nadu. pic.twitter.com/RGSctUWX7A
— ANI (@ANI) March 22, 2024
2 मार्च रोजी पहिली यादी जाहीर – | Lok Sabha Election 2024
भाजपाने 2 मार्च रोजी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. या यादीत देशभरातील एकूण 195 मतदारसंघांचा समावेश होता. यात मोदी सरकारमध्ये मंत्री असलेल्या 34 मंत्र्यांनाही उमेदवारी देण्यात आली होती. विशेष म्हणजे याच पहिल्या यादीत भाजपाने एकूण 28 महिला नेत्यांनाही उमेदवारी दिली होती.