Live Cricket Score, RCB vs KKR Indian Premier League 2024 : आयपीएल 2024 चा 10 वा सामना आज (शुक्रवार,दि.29) रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात होणार आहे. या सामन्यात, दोन्ही संघ एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू येथे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता आमने-सामने असतील.
दोन्ही संघ आपले मागील सामने जिंकून मैदानात उतरले आहेत. शेवटच्या सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा चार गडी राखून पराभव केला तर केकेआरने सनरायझर्स हैदराबादचा चार धावांनी पराभव केला आहे.
कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत आरसीबी प्रथम फलंदाजी करताना दिसेल.( Kolkata Knight Riders Won the Toss & elected to Field ) या सामन्यात अनुकुल रॉयने केकेआर संघात प्रवेश केला आहे. तर आरसीबी कोणताही बदल न करता खेळताना दिसेल.
🚨 Toss 🚨@KKRiders win the toss and elect to field against @RCBTweets
Follow the Match ▶️ https://t.co/CJLmcs7aNa #TATAIPL | #RCBvKKR pic.twitter.com/hUcwrrKilK
— IndianPremierLeague (@IPL) March 29, 2024
RCB vs KKR : दोन्ही संघाची Playing 11 खालीलप्रमाणे…
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), कॅमेरून ग्रीन, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.
इम्पॅक्ट सब : महिपाल लोमरोर, सुयश प्रभुदेसाई, कर्ण शर्मा, विजयकुमार विशाक, स्वप्नील सिंग.
कोलकाता नाइट रायडर्स : फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रमणदीप सिंग, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, मिचेल स्टार्क, अनुकुल रॉय, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
इम्पॅक्ट सब : सुयश शर्मा, वैभव अरोरा, मनीष पांडे, अंगक्रिश रघुवंशी, रहमानउल्ला गुरबाज.
IPL (2008 – 2024) : आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे Top-10 फलंदाज, पाहा यादी…
आयपीएलच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स 32 वेळा आमनेसामने आले आहेत. या कालावधीत बेंगळुरूने 14 सामने जिंकले असून कोलकाताने 18 सामने जिंकले आहेत. यावरून हे सहज लक्षात येईल की, आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्सचे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर वर्चस्व राहिले आहे.