United Nations On Kejriwal arrest : भारतात निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच्या काळात विरोधकांची जी गळचेपी सुरू आहे, त्यावर संयुक्त राष्ट्रांनीही चिंता व्यक्त केली आहे. संयुक्तराष्ट्रांचे सरचिटणीस ॲन्टनी गुटेर्रेस यांच्यावतीने या विषयावर प्रतिक्रीया देताना त्यांच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, आम्हाला आशा आहे की, भारतात आणि ज्या देशात निवडणूक प्रक्रिया सुरू असते त्या देशातील नागरीकांचे राजकीय आणि नागरी हक्कांचे संरक्षण केले जाईल. प्रत्येकाला निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात मतदान करता आले पाहिजे अशी प्रतिक्रीयाही गुटेर्रेस यांच्या प्रवक्त्याने दिली आहे.
भारतात अरविंद केजरीवालांना अटक करण्यात आली, तसेच देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेस पक्षाची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. त्या अनुषंगाने पत्रकारांनी संयुक्तराष्ट्र सरचिटणीसांच्या प्रवक्त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. | United Nations reaction to Kejriwal’s arrest
या आधीही जर्मनी आणि अमेरिकेनेही भारतातील राजकीय अशांततेवर तसेच केजरीवालांवर करण्यात आलेल्या कारवाईवर तीव्र चिंता व्यक्त केली होती. त्यांना निष्पक्ष आणि त्वरीत न्याय दिला जाईल अशी अपेक्षाही या दोन्ही देशांनी व्यक्त केली होती. | United Nations reaction to Kejriwal’s arrest
तथापि भारत सरकारने या प्रतिक्रियांवर तीव्र आक्षेप घेत हा भारताच्या अंतर्गत कारभारावरील हस्तक्षेप असल्याचे म्हटले होते, तसेच भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानेही या दोन्ही देशांच्या प्रतिनिधींना आपल्या कार्यालयात पाचारण करून त्यांना या विषयीची समजही दिली आहे. तथापि संयुक्तराष्ट्रांच्या आजच्या प्रतिक्रीयेबाबत भारताची प्रतिक्रीया अजून आलेली नाही. | United Nations reaction to Kejriwal’s arrest
WhatsApp वर प्रचार करणे पडले महागात ! जिल्हा परिषद कर्मचारी निलंबित..
Voting Card च्या डिजिटल व्हर्जनने करता येणार मतदान ! ‘जाणून घ्या’ कसं करायचं डाउनलोड