Live Cricket Score, RCB vs KKR Indian Premier League 2024 : आयपीएल 2024 चा 10 वा सामना आज (शुक्रवार,दि.29) रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात होणार आहे. या सामन्यात, दोन्ही संघ एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू येथे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता आमने-सामने असतील.
दोन्ही संघ आपले मागील सामने जिंकून मैदानात उतरले आहेत. शेवटच्या सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा चार गडी राखून पराभव केला तर केकेआरने सनरायझर्स हैदराबादचा चार धावांनी पराभव केला आहे.
कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत आरसीबी प्रथम फलंदाजी करताना दिसेल.( Kolkata Knight Riders Won the Toss & elected to Field ) या सामन्यात अनुकुल रॉयने केकेआर संघात प्रवेश केला आहे. तर आरसीबी कोणताही बदल न करता खेळताना दिसेल.
🚨 Toss 🚨@KKRiders win the toss and elect to field against @RCBTweets
Follow the Match ▶️ https://t.co/CJLmcs7aNa #TATAIPL | #RCBvKKR pic.twitter.com/hUcwrrKilK
— IndianPremierLeague (@IPL) March 29, 2024
फिलिप सॉल्ट, सुनील नरेन, आंद्रे रसेल आणि मिचेल स्टार्क हे चार परदेशी खेळाडू कोलकाता संघात खेळताना दिसणार आहेत. त्याचवेळी, RCB संघ फाफ डुप्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन आणि अल्झारी जोसेफ या चार विदेशी खेळाडूंसह या सामन्यात प्रवेश करेल.
RCB vs KKR Head To Head Records…
आयपीएलच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स 32 वेळा आमनेसामने आले आहेत. या कालावधीत बेंगळुरूने 14 सामने जिंकले असून कोलकाताने 18 सामने जिंकले आहेत. यावरून हे सहज लक्षात येईल की, आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्सचे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर वर्चस्व राहिले आहे.