Praveen Kumar slams Hardik Pandya :- आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स संघ एका नव्या कर्णधाराखाली खेळताना दिसणार आहे. पाचवेळा चॅम्पियन संघाला हार्दिक पंड्याच्या रूपाने नवा कर्णधार मिळाला आहे, तर माजी कर्णधार रोहित शर्मा केवळ फलंदाज म्हणून खेळताना दिसणार आहे. यावर भारताचा माजी क्रिकेटपटू प्रविण कुमारने पंड्यावर टीका केली आहे.
आयपीएलच्या माध्यमातून पैसे कमावणे गैर नाही मात्र, जो देशासाठी खेळताना दुखापतग्रस्त होतो व आयपीएलच्या काही दिवस आधी पूर्ण तंदुरुस्त ठरतो ही जादू कशी होते, असा सवाल प्रविण कुमारने पंड्याला केला आहे.
गेल्या चार-पाच महिन्यांपासून तो क्रिकेट खेळत नाही. आयपीएलच्या काही महिन्यांपूर्वी तुम्ही जखमी झालात, तुम्ही देशासाठी खेळत नाही, तुम्ही देशांतर्गत क्रिकेटमध्ये तुमच्या राज्यासाठी खेळत नाही आणि फक्त आयपीएलमध्ये खेळता. गोष्टी अशा प्रकारे चालत नाहीत. पैसे कमावणे ठीक आहे, यात काही गैर नाही. पण तुम्हाला राज्य आणि देशासाठी खेळायचे आहे आणि आता लोक फक्त आयपीएललाच महत्त्व देतात, असेही प्रविण कुमारने म्हटले आहे.
Ranji Trophy 2024 : चॅम्पियन मुंबईवर पैशांचा पाऊस…! जाणून घ्या, किती मिळाली बक्षिसाची रक्कम…
प्रवीण आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळला आहे. या माजी वेगवान गोलंदाजाने युवा खेळाडूंना आयपीएल पेक्षा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला. आणि त्यांच्या कारकिर्दीत दोन्ही समतोल राखण्याचा प्रयत्न केला.