वॉशिंग्टन । शिक्षण हा सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग मानला जातो आणि प्रत्येकजण आयुष्यात शिक्षण घेत असतो पण या क्षेत्रातही काही विक्रम करणारे असतात अमेरिकेतील एका मुलीने वयाच्या दहाव्या वर्षी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आणि 17 व्या वर्षी तिने डॉक्टरेटही मिळवली डोरोथि जीन तीलमन असे या मुलीचे नाव असून ती अमेरिकेतील ऍरिझोना राज्यातील आहे डिसेंम्बर 2023 मध्ये तिने आपल्या महाविद्यालयामधूनच आरोग्य विषयावर एक डॉक्टरेट मिळवली दहाव्या वर्षीच महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या डोरोथिने 17 व्या वर्षापूर्वीच आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले होते सतराव्या वर्षी आपली डॉक्टरेट डिग्री मिळवणारी ती सर्वात तरुण विद्यार्थिनी ठरली.
दहाव्या वर्षीच महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या डोरोफिने सायकॉलॉजी या विषयांमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले ज्या कालावधीमध्ये लहान मुले खेळामध्ये मग्न असतात त्याच कालावधीमध्ये डोरोथीने शाळेत आणि कॉलेजमध्ये आपली शैक्षणिक कारकीर्द गाजवायला सुरुवात केली होती.
16 व्या वर्षीच ग्रॅज्युएशन पूर्ण करणाऱ्या डोरोथिने आपली मास्टर डिग्री सुद्धा वर्षभरात पूर्ण केली त्यानंतर तिने आरोग्याशी संबंधित एका विषयावर संशोधन सुरू करून त्या विषयावर डॉक्टरेट मिळवली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिने हे सर्व अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने पूर्ण केले जेव्हा गरज असेल तेव्हा ती महाविद्यालयामध्ये उपस्थित रहात असे पण जास्त अभ्यास ऑनलाईनच पूर्ण करून तिने हा विक्रम केला आहे अभ्यासाच्या क्षेत्रात एवढे प्रचंड यश मिळवत असतानाच या वयातील वयातील विद्यार्थिनी जी मजा करत असतात त्या मजेचा अनुभव मी मिस केला असे मात्र ती सांगते.