Sambhaji Nagar Crime । मुलगा आणि वडील या हळव्या नात्याला काळिमा फासणारी घटना राज्यात घडलीय. वडील लग्न लावून देत नाहीत. या रागातून दोन मुलांनी बापावर चाकूने वार करत त्यांना ठार केल्याची धक्कादायक घटना घडलीय. छत्रपती संभाजीनगर जवळच्या वडगाव कोल्हाटीत घटना घडली. या घटनेत संपत वाहूळ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पोपट वाहूळ आणि प्रकाश वाहूळ या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संपत वाहुळ हे वडगाव कोल्हाटी येथे आपल्या कुटुंबासह राहत होते. त्यांचा मुलगा पोपट वाहुळ आणि प्रकाश वाहुळ ही दोन्ही मुले एका कंपनीत काम करत होती. वाहुळ यांच्या नावावर शेती होती. 8 मे रोजी संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान लहान मुलगा प्रकाश कामावरून घरी आला. त्यावेळी वडील संपत वाहुळे हे घरात एकटेच होती. कामावरून परतलेला प्रकाश रागात होता. आल्याबरोबर त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. नंतर बुटाने वडिलांना मारहाण केली. त्यानंतर मोठा मुलगा पोपट देखील कामावरून आला. त्याने देखील वडिलांना आमचे वय वाढत आहे, तरी सुद्धा आमच्या लग्नाचे मनावर का घेत नाही, ? अशी विचारणा केली. त्यावर वडिलांनी तुम्ही दोघेही नीट वागत नाही, असे सांगितले.
दोन्ही भाऊ वडिलांवर तुटून पडले Sambhaji Nagar Crime ।
वडिलांचे हे उत्तर ऐकून दोन्ही मुलांचा राग अनावर झाला. मोठा मुलगा प्रकाशने जवळील चाकू काढत वडिलांवर सपासप वार केले. दोन्ही मुले बापावर तुटून पडले बापाने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. जीव वाचवण्याासाठी ते बाहेर पळाले, मोठ्या मुलाने पाठलाग करत त्यांना पकडले. नंतर लहान मुलाने त्यांच्यावर वार केले. आरडा ओरड ऐकून संपत वाहुळ यांचे भाऊ रामनाथ वाहुळ, संजय वाहुळ, आकाश व संदीप वाहुळ हे मदतीस धाऊन आले, त्यावेळी हा आता वाचला तर गोळी घालून मारून टाकू अशी धमकी मुलांनी दिली. यामध्ये ते रक्तबंबाळ झाले. त्यानंतर संपत वाहुळ यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रात्री 11.30 वाजता त्यांचा मृत्यू झाला.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल Sambhaji Nagar Crime ।
याप्रकरणी दोन्ही मुलांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपचार सुरू असतांना 23 मे रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पुढील तापास पोलीस करत आहे. या घटनेनंतर परिसरात मुलाच्या कृत्याबद्दल संताप तर वडिलांसाठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.