Indian Premier League 2024 Live Cricket Score, SRH vs MI : आयपीएल 2024 च्या आठव्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दमदार कामगिरी करत मुंबई इंडियन्सचा 31 धावांनी पराभव केला. हैदराबादचा या स्पर्धेतील हा पहिलाच विजय आहे ज्यात अनेक विक्रम झाले.
पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली संघाने आयपीएलच्या इतिहासात सर्वोच्च धावसंख्या उभारली. संघाने 20 षटकांत 3 गडी गमावून 277 धावा केल्या, याला प्रत्युत्तर म्हणून मुंबईला 20 षटकांत 5 गडी गमावून 246 धावा करता आल्या. या विजयासह हैदराबादने गुणतालिकेत तिसरे स्थान गाठले, तर सलग दोन सामने गमावल्यानंतर मुंबईची नवव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
मुंबईकङून तिलक वर्माने सर्वाधिक 64 धावांची खेळी केली तर टीम डेव्हिडने 42 धावांची नाबाद खेळी खेळली. जयदेव उनाडकट आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी दोन गडी बाद केले. या सामन्यात 38 षटकार मारले गेले. हैदराबादने 18 षटकार तर मुंबईने 20 षटकार मारले.
तत्पूर्वी, मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र कर्णधार हार्दिक पांड्याचा हा निर्णय साफ चुकीचा ठरला. सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली. हैदराबादने 20 षटकात 3 विकेट गमावत 277 धावा केल्या. यासह हैदराबादने स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत आरसीबीचा विक्रम मोडला. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (RCB) 2013 मध्ये बेंगळुरू येथे पुणे वॉरियर्स इंडिया विरुद्ध 263 धावा केल्या होत्या.
मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, ज्याचा त्यांना नंतर पश्चाताप झाला असावा, कारण प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 20 षटकांत आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. हैदराबादच्या स्फोटक खेळीची सुरुवात ट्रॅव्हिस हेडने केली होती, त्याला अभिषेक शर्मा आणि हेनरिक क्लासेनने पुढे नेले.
हैदराबादचा सलामीचा फलंदाज मयंक अग्रवाल (13 चेंडूत 11) स्वस्तात बाद झाला असला तरीही ट्रेव्हिस हेडने 24 चेंडूत 3 षटकार आणि 9 चौकारासह 62 धावांची तर अभिषेक शर्मानं 23 चेंडूत 7 षटकार आणि 2 चौकारासह 63 धावांची खेळी केली. या सामन्यात एडन मारक्रम आणि हेनरिक क्लासेन नाबाद राहिले. मारक्रम याने 28 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 42 धावा तर क्लासेन याने 34 चेंडूत 7 षटकार आणि 4 चौकारासह सर्वाधिक 80 धावांची तूफानी खेळी केली.
IPL 2024 (#MIvsSRH Match 8) : ट्रॅव्हिस हेडचा झेल सोडणं मुंबईला पडलं महागात; 18 चेंडूतच झळकावले….
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांबदल बोलायचे झाले तर या सामन्यात त्यांनी साफ निराशा केली आहे. क्वेना मफाका या युवा गोलंदाजाने 4 षटकात सर्वाधिक 66 धावा दिल्या. त्याला एकही विकेट मिळाली नाही . त्यानंतर कोएत्झीने 4 षटकात 57 धावा देत 1 गडी बाद केला. त्यानं यादरम्यान 6 वाइड टाकले. पियुष चावला आणि मुलानी यांनी 2 षटकात अनुक्रमे 34 आणि 33 धावा दिल्या. चावला याला 1 विकेट घेण्यात यश मिळाले. पांड्याने 4 षटकात 46 धावा देत 1 विकेट घेतली. तर अनुभवी व स्टार गोलंदाज बुमराहने 4 षटकांत सर्वात कमी 36 धावा दिल्या, मात्र विकेट घेण्यात तो अपयशी ठरला.