Indian Premier League 2024 Live Cricket Score, SRH vs MI : आज आयपीएल 2024 च्या आठव्या सामन्यात, पाच वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघ 2016 च्या चॅम्पियन संघ सनरायझर्स हैदराबादशी भिडणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र कर्णधार हार्दिक पांड्याचा हा निर्णय साफ चुकीचा ठरला.
सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली. आयपीएल 2024 च्या आठव्या सामन्यात हैदराबादने मुंबई विरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात 20 षटकात 3 विकेट गमावत 277 धावा केल्या असून मुंबईसमोर 278 धावांचे तगडं आव्हान ठेवलं आहे. हैदराबादने स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत आरसीबीचा विक्रम मोडला. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (RCB) 2013 मध्ये बेंगळुरू येथे पुणे वॉरियर्स इंडिया विरुद्ध 263 धावा केल्या होत्या.
आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्येची यादी
1. सनरायझर्स हैदराबाद 277/3 vs मुंबई इंडियन्स (आयपीएल 2024)*
2. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू 263/5 vs पुणे वॉरियर्स इंडिया in (आयपीएल 2013)
3. लखनौ सुपर जायंट्स 256/5 vs पंजाब किंग्जस in (आयपीएल 2023)
4. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू 248/3 vs गुजरात लायन्स् in (आयपीएल 2016)
5. चेन्नई सुपर किंग्ज 246/5 vs राजस्थान रॉयल्स in (आयपीएल 2010)
6. कोलकाता नाईट रायडर्स 245/6 vs किंग्ज इलेव्हन पंजाब in (आयपीएल 2018)
7. चेन्नई सुपर किंग्ज 240/5 vs किंग्ज इलेव्हन पंजाब (आयपीएल 2008)
8. चेन्नई सुपर किंग्ज 235/4 vs कोलकाता नाईट रायडर्स (आयपीएल 2023)
मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, ज्याचा त्यांना नंतर पश्चाताप झाला असावा, कारण प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 20 षटकांत आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. हैदराबादच्या स्फोटक खेळीची सुरुवात ट्रॅव्हिस हेडने केली होती, त्याला अभिषेक शर्मा आणि हेनरिक क्लासेनने पुढे नेले.
Innings Break!
It’s a record smashing evening in Hyderabad and @mipaltan need to break another to clinch a win!
Chase coming up shortly ⌛️
Scorecard ▶️ https://t.co/oi6mgyCP5s#TATAIPL | #SRHvMI pic.twitter.com/JQgFaT2Hdt
— IndianPremierLeague (@IPL) March 27, 2024
हैदराबादचा सलामीचा फलंदाज मयंक अग्रवाल (13 चेंडूत 11) स्वस्तात बाद झाला असला तरीही ट्रेव्हिस हेडने 24 चेंडूत 3 षटकार आणि 9 चौकारासह 62 धावांची तर अभिषेक शर्मानं 23 चेंडूत 7 षटकार आणि 2 चौकारासह 63 धावांची खेळी केली. या सामन्यात एडन मारक्रम आणि हेनरिक क्लासेन नाबाद राहिले. मारक्रम याने 28 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 42 धावा तर क्लासेन याने 34 चेंडूत 7 षटकार आणि 4 चौकारासह सर्वाधिक 80 धावांची तूफानी खेळी केली.
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांबदल बोलायचे झाले तर या सामन्यात त्यांनी साफ निराशा केली आहे. क्वेना मफाका या युवा गोलंदाजाने 4 षटकात सर्वाधिक 66 धावा दिल्या. त्याला एकही विकेट मिळाली नाही . त्यानंतर कोएत्झीने 4 षटकात 57 धावा देत 1 गडी बाद केला. त्यानं यादरम्यान 6 वाइड टाकले. पियुष चावला आणि मुलानी यांनी 2 षटकात अनुक्रमे 34 आणि 33 धावा दिल्या. चावला याला 1 विकेट घेण्यात यश मिळाले. पांड्याने 4 षटकात 46 धावा देत 1 विकेट घेतली. तर अनुभवी व स्टार गोलंदाज बुमराहने 4 षटकांत सर्वात कमी 36 धावा दिल्या, मात्र विकेट घेण्यात तो अपयशी ठरला.