पिंपरी, (प्रतिनिधी) – जागतिक जलदिनानिमित्त ईसीएच्या मार्गदर्शनाखाली महापालिका आणि खासगी शाळेमधून जल प्रतिज्ञाचे वाचन करण्यात आले. तसेच जागतिक जलदिनानिमित्त पर्यावरण जनजागृती करण्यात आली.
या वेळी महापालिकेच्या बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जल प्रतिज्ञा देण्यात आली. तसेच पाणी बचती विषयी विद्यार्थ्यांना काही सूचना देण्यात आल्या.
हा उपक्रम शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील शाळेमधून राबवण्यात आला. पाणी बचत करणे, जलस्रोत प्रदूषण मुक्त ठेवणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग विषयी माहिती विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.