IPL 2024 ( RR vs SRH Qualifier2, Toss & Playing XI Update) : आयपीएल 2024 आता समारोपाकडे वाटचाल करत आहे आणि आता चालू हंगामात फक्त दोन सामने शिल्लक आहेत. क्वालिफायर-2 सामना आज संध्याकाळी 7.30 वाजता चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. हैदराबाद आणि राजस्थान यांच्यातील हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल जिथे त्यांचा रविवारी कोलकाता नाईट रायडर्सशी (केकेआर) सामना होईल.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल (Toss Update) हा राजस्थान रॉयल्स संघाच्या बाजूनं लागला आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (Rajasthan Royals elect to bowl against Sunrisers Hyderabad) त्यामुळे सनरायझर्स हैदराबादचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरेल. राजस्थान संघाने क्वालिफायर-2 सामन्यासाठी प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. विजयकांत वायस्कांतच्या जागी एडन मार्करम हैदराबाद संघात परतला आहे.
🚨 Toss Update 🚨
Rajasthan Royals elect to bowl against Sunrisers Hyderabad.
Follow the Match ▶️ https://t.co/Oulcd2G2zx#TATAIPL | #SRHvRR | #Qualifier2 | #TheFinalCall pic.twitter.com/LMIQIBLEyf
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2024
RR vs SRH Qualifier2 : दोन्ही संघांची Playing 11 खालीलप्रमाणे….
सनरायझर्स हैदराबाद : ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी. नटराजन. (इम्पॅक्ट सब : उमरान मलिक, सनवीर सिंग, ग्लेन फिलिप्स, मयंक मार्कंडे, शाहबाज अहमद)
राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, टॉम कोहलर कॅडमोर, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रायन पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल. (इम्पॅक्ट सब: शिमरॉन हेटमायर, नांद्रे बर्जर, शुभम दुबे, डेनोवन फरेरा, कुलदीप सेन.)
हैदराबाद आणि राजस्थान यांच्यातील हा सामना चेन्नईमध्ये होणार असून आज तमिळनाडूसह दक्षिण भारतात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मात्र, चेन्नईतील सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नाही. चालू आयपीएल मोसमात पावसामुळे तीन सामने पूर्णपणे वाहून गेले असले तरी या महत्त्वाच्या सामन्यासाठी हवामान खात्याचा अंदाज हा चाहत्यांसाठी दिलासा देणारा आहे.
दरम्यान, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या क्वालिफायर-1 सामन्यात दोन वेळचा चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ने चमकदार कामगिरी केली आणि हैदराबादचा आठ गडी राखून पराभव करून थाटात अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे, आयपीएल 2024 च्या एलिमिनेटरमध्ये, राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) चा चार विकेट्स राखून पराभव केला. त्यामुळे आरसीबी स्पर्धेतून बाहेर पडले.
हैदराबादचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे, त्यामुळे क्वालिफायर-1 सामना गमावूनही त्याचा प्रवास संपला नाही. राजस्थानने अंतिम फेरी गाठण्याचा पहिला अडथळा पार केला , मात्र गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर राहिल्याने त्यांना आता आज क्वालिफायर-2 मध्ये हैदराबादचा सामना करावा लागणार आहे.