मेहबूबा मुफ्तीने मोबाईल नंबरचे आउटगोइंग कॉल सस्पेंड केल्याचा केला आरोप

Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाला सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. या टप्प्यात सहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 58 जागांवर मतदान होत आहे. दिल्लीतील 7, उत्तर प्रदेशातील 14, बिहारमधील 8, पश्चिम बंगालमधील 8, हरियाणातील 10, झारखंडमधील 4, ओडिशातील 6 आणि जम्मू-काश्मीरमधील एका जागेवर मतदान होत आहे.
2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यात 62.2 टक्के मतदान झाले. 25 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 428 जागांवर पाच टप्प्यात मतदान झाले. आज सहाव्या टप्प्यातील मतदानानंतर सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी १ जूनला मतदान होणार असून त्यानंतर ४ जूनला निकाल लागणार आहे.
#WATCH | Anantnag, J&K: PDP chief and candidate from Anantnag–Rajouri Lok Sabha seat, Mehbooba Mufti along with party leaders and workers sit on a protest.
She alleged that the police have detained PDP polling agents and workers without any reason. pic.twitter.com/dPJb4dolKQ
— ANI (@ANI) May 25, 2024
अशातच पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी आज दावा केला की, त्यांच्या मोबाईल क्रमांकावरील आउटगोइंग कॉल कोणतेही स्पष्टीकरण न देता निलंबित करण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत, जिथे सध्या मतदान सुरू आहे.दरम्यान, मतदानाच्या दिवशी रस्त्यावर बसून मेहबूबा मुफ्तीन आंदोलन करत आहे. काल रात्रीपासून आमच्या कार्यकर्त्यांचा छळ होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
हे वाचाल का ?
मला पाठिंबा, आशीर्वाद दिल्याबद्दल भाजप आणि पंतप्रधानांचे आभार: संबित पात्रा
सहाव्या टप्प्यात लोकसभेच्या 58 जागांसाठी मतदान सुरू, सकाळी 9 वाजेपर्यंत 10.82% मतदान
बीजेडी नेते व्हीके पांडियन मतदान करण्यासाठी पोहोचले ऑटो रिक्षाने





