बीजेडी नेते व्हीके पांडियन मतदान करण्यासाठी पोहोचले ऑटो रिक्षाने
Updated On:

Lok Sabha Election 2024 । 5T चे अध्यक्ष आणि BJD नेते VK पांडियन यांनी लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या सहाव्या टप्प्यासाठी आणि ओडिशा विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी भुवनेश्वरमधील मतदान केंद्रावर मतदान केले. ऑटोने ते मतदान केंद्रावर पोहोचले.
मतदानानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पांडियन म्हणाले, ‘प्रत्येकाने लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन आपल्या मताचा वापर केला पाहिजे. आपण सर्व मिळून मतदानाचा टक्का वाढवूया. माझा मताधिकार वापरताना मला खूप आनंद होत आहे. लोकशाहीत सर्वजण समान आहेत. ऑटो असोसिएशनने मला विनंती केली म्हणून मी ऑटो रिक्षात आलो.’
हे वाचले का ?
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; अमित शाहांचे मतदारांना आवाहन





