Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आज 58 जागांवर मतदान होत आहे. राजधानी दिल्लीतील सातही जागांवर मतदान सुरू असून लोक हळूहळू मतदानासाठी येत आहेत. दिल्लीतील लोधी इस्टेट येथील अटल आदर्श शाळेत मतदान करण्यासाठी आलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा मुलगा रेहान याने मतदान केल्यानंतर वृत्त वाहिनीशी संवाद साधला रेहानने सांगितले की, महागाई, रोजगार आणि संविधान हे त्यांच्यासाठी मुद्दे आहेत.’
#WATCH | After casting vote, Raihan Rajiv Vadra, son of Robert Vadra and Congress leader Priyanka Gandhi Vadra says, “I think this is a very important election. I encourage all the youth to vote to save our Constitution and to vote in a way that brings positive change.”
Miraya… https://t.co/nrmkwcenj1 pic.twitter.com/A6VF9vBCAZ
— ANI (@ANI) May 25, 2024
मतदान केल्यानंतर रेहान म्हणाला, ‘मी पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करत आहे, मागच्या वेळी मी दिल्ली राज्याच्या निवडणुकीत मतदान केले होते. मी जनतेला मतदानासाठी बाहेर पडून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करेन. विकास आणि बेरोजगारी या समस्यांचे वर्णन करताना रेहान म्हणाला, ‘व्यक्तिशः माझ्यासाठी संविधान हा एक मोठा मुद्दा आहे.’ त्या पुढे सांगितले,’मला वाटते ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. मी सर्व तरुणांना आवाहन करतो की, आपले संविधान वाचवण्यासाठी आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी मतदान करा.’
वृत्तवाहिनीशी बोलताना रॉबर्ट वाड्रा आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा यांची मुलगी मिराया वड्रा म्हणाली,’मी कॉलेजमधून फक्त मतदान करण्यासाठी आले आहे. प्रत्येकाने बाहेर पडून मतदान केले पाहिजे…’
इंडिया ब्लॉक आणि भाजपमध्ये स्पर्धा
दिल्लीतील सातही जागांवर भाजप आणि इंडिया ब्लॉकमध्ये थेट लढत आहे. काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यात युती होत आहे. भाजपच्या विरोधात आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने संयुक्त उमेदवार उभे करण्याची ही पहिलीच वेळ आहे. आप चार जागांवर निवडणूक लढवत आहे, तर उर्वरित तीन जागांवर काँग्रेसने आपले उमेदवार उभे केले आहेत.
हे वाचाल का ?
बीजेडी नेते व्हीके पांडियन मतदान करण्यासाठी पोहोचले ऑटो रिक्षाने
मेहबूबा मुफ्तीने मोबाईल नंबरचे आउटगोइंग कॉल सस्पेंड केल्याचा केला आरोप
दिल्लीतील सातही लोकसभा मतदार संघासाठी आज मतदान; ‘या’ उमेदवारांमध्ये रंगणार सामना