Live Cricket Score, KKR vs LSG Indian Premier League 2024 :आज, IPL 2024 च्या 28 व्या सामन्यात, कोलकाता नाइट रायडर्स (KKR) लखनऊ सुपरजायंट्सचा सामना करत आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. कोलकाता आणि लखनौ या दोन्ही संघांना त्यांच्या शेवटच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यामुळे दोन्ही संघ विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करतील.
लखनौ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात सात विकेट्स गमावून 161 धावा केल्या असून केकेआरला आता विजयासाठी 162 धावा कराव्या लागतील. केएल राहुल आणि निकोलस पुरन यांनी शानदार खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले.
Innings Break ‼️
A complete bowling performance from the @KKRiders bowlers restrict #LSG to 161/7 👌👌
Will @LucknowIPL defend the target? 🤔
Stay Tuned for the #KKR chase ⌛️
Scorecard ▶ https://t.co/ckcdJJTe3n #TATAIPL | #KKRvLSG pic.twitter.com/ydFtQ425GT
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2024
लखनौ सुपर जायंट्सची सुरुवात चांगली झाली नाही कारण संघाची धावसंख्या 39 असताना टीमने क्विंटन डी कॉक (10) आणि दीपक हुडा (08) यांच्या विकेट्स गमावल्या. अशा परिस्थितीत कर्णधार केएल राहुलने 27 चेंडूत 39 धावांच्या खेळीत 3 चौकार आणि 2 षटकार खेचून संघाला पुन्हा एकदा संकटातून सोडवले. त्याच्याशिवाय आयुष बडोनीने 29 धावांचे तर झंझावाती फलंदाज निकोलस पुरनने 32 चेंडूत 45 धावांचे योगदान दिले. कोलकाताकडून खूप तगडी गोलंदाजी होती कारण 6 पैकी 5 गोलंदाजांनी प्रत्येकी किमान एक विकेट घेतली.
लखनौ सुपर जायंट्सकडून निकोलस पुरनने सर्वाधिक 45 धावा केल्या. त्याने आपल्या झंझावाती खेळीत 2 चौकार आणि 4 षटकार मारले. लखनौ सुपर जायंट्सच्या फलंदाजांनी शेवटच्या 3 षटकात 38 धावा केल्या. 17 व्या षटकानंतर संघाची धावसंख्या 126 धावा होती आणि धावगती पाहता संघ 150 धावांपर्यंतही पोहोचू शकणार नाही असे वाटत होते. मात्र अखेरच्या षटकांमध्ये पुरनच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर लखनौने 161 धावसंख्येपर्यंत मजल मारली.
IPL 2024 : पंजाब किंग्जला दुहेरी झटका, कर्णधार ‘शिखर धवन’ बाबत मोठी अपडेट आली समोर….
केकेआरची तगडी गोलंदाजी…
कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवातीपासूनच तगडी गोलंदाजी होती. प्रथम वैभव अरोराने क्विंटन डी कॉकला बाद केले आणि काही वेळाने मिचेल स्टार्कने दीपक हुडाला स्वस्तात बाद केले. केकेआरच्या गोलंदाजांनी मधल्या षटकांमध्येही वर्चस्व गाजवले कारण गोलंदाजांनी लखनौच्या फलंदाजांमध्ये कोणतीही मोठी भागीदारी होऊ दिली नाही. आंद्रे रसेलने एक षटक टाकताना 16 धावा दिल्या, तरी त्याने एक विकेटही घेतली. त्याच्याशिवाय मिचेल स्टार्कने 3, वैभव अरोरा, सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी एक विकेट घेतली.