Live Cricket Score, RR vs GT, Indian Premier League 2024 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 चा 24 वा सामना आज राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात संध्याकाळी 7:30 वाजता जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर होणार होता. मात्र पावसामुळे सामन्यास उशीर झाला आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे.
सध्या जयपूरमध्ये पाऊस थांबला असून जमिनीवरून कव्हर काढण्यात आले आहेत. आता नाणेफेक (Toss) 7:25 वाजता झाला असून, पहिला चेंडू 7:40 वाजता टाकला जाईल. नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान रॉयल्सचे खेळाडू प्रथम फलंदाजीसाठी उतरतील. गुजरात संघात दोन बदल करण्यात आले आहेत. केन विल्यमसनच्या जागी मॅथ्यू वेडला संधी मिळाली असून शरथच्या जागी अभिनव मनोहरचा संघात समावेश करण्यात आला आहे.
गुजरात संघाने मॅथ्यू वेड, राशिद खान, स्पेन्सर जॉन्सन आणि नूर अहमद या चार परदेशी खेळाडूंना मैदानात उतरवले आहे. त्याच वेळी, जोस बटलर, शिमरॉन हेटमायर आणि ट्रेंट बोल्टसह तीन परदेशी खेळाडू राजस्थानकडून खेळताना दिसणार आहेत.
RR vs GT Live Score : दोन्ही संघाची प्लेइंग 11 खालीलप्रमाणे….
गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, विजय शंकर, अभिनव मनोहर, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन, नूर अहमद, मोहित शर्मा.
इम्पॅक्ट सब : शरथ बीआर, शाहरुख खान, दर्शन नळकांडे, रविश्रीनिवासन साई किशोर, मानव सुथार.
One change. Same Halla Bol! 🔥
Recover well, Nandre. Go well, Sen. 💗#RoyalsFamily | @Dream11 pic.twitter.com/SMrnpWY9H1
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 10, 2024
राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल.
इम्पॅक्ट सब : रोवमन पॉवेल, तनुष कोटियन, शुभम दुबे, केशव महाराज, नवदीप सैनी.
आयपीएल 2024 मध्ये सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. जयपूरमध्ये पावसामुळे टॉसला उशीर झाला. राजस्थान आणि गुजरात यांच्यात होणारा सामना खूपच रंजक ठरू शकतो. आता पावसामुळे दोन्ही संघांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. क्षेत्ररक्षणादरम्यान चेंडू स्किट होईल. याचा फायदा फलंदाजांना होऊ शकतो. जमिनीवर हलके पाणी असेल. याचा परिणाम क्षेत्ररक्षणादरम्यान होईल.
राजस्थान आणि गुजरात ( Rajasthan Royals vs Gujarat Titans ) यांच्यातील संघर्ष आणि आकडेवारीबद्दल बोलायचे तर, दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण पाच सामने खेळले गेले आहेत. गुजरातने यापैकी चार सामने जिंकले आहेत, तर राजस्थान संघाने केवळ एकच सामना जिंकला आहे. मात्र, गुजरातने जे चार सामने जिंकले ते हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली होते. आता तो मुंबईच्या संघात गेला आहे.
शुभमनच्या नेतृत्वाखालील गुजरात संघासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे, कारण हा संघ सध्या चार गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. तर दुसरीकडे संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान संघ हा एकमेव संघ आहे ज्याने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. चार सामन्यांत त्यांचे आठ गुण आहेत आणि ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहेत. त्याच वेळी, चार संघांचे प्रत्येकी सहा गुण आहेत. दोन संघांचे प्रत्येकी चार गुण आणि तीन संघांचे प्रत्येकी दोन गुण आहेत. अशा स्थितीत या वेळी अंतिम चारमध्ये पोहोचण्याची लढत अत्यंत रंजक असणार आहे.