RCB Virat Kohli Fan Beaten : आयपीएल 2024 मध्ये एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात विराट कोहलीने 77 धावांची शानदार खेळी खेळली, ज्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला विजय मिळवता आला.
मात्र या खेळीदरम्यान कोहलीच्या एका चाहत्याने सुरक्षेला चकमा देत त्याला भेटण्यासाठी मैदानात प्रवेश केला आणि तो आधी विराट कोहलीच्या पाया पडला आणि नंतर त्याला मिठीही मारली. मात्र यानंतर सुरक्षारक्षकांनी तात्काळ धाव घेत त्याला मैदानाबाहेर काढलं.
First Video 👇👇👇👇👇👇
A fan breached the field and touched Virat Kohli’s feet.
– King Kohli, an icon! ❤️pic.twitter.com/s82xq8sKhW
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 25, 2024
इथपर्यंतचा मैदानातील आतचा व्हिडीओ सर्वांनी पाहिलं होता. पण आता त्यानंतरचा म्हणजेच मैदानाबोहरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कोहलीच्या पाया पडणाऱ्या चाहत्याला मैदानाबाहेर नेऊन बेदम मारहाण करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
Second Video 👇👇👇👇👇👇
The fan who obstructed the field to meet Virat Kohli was beaten up black and blue.
Thoughts?pic.twitter.com/BZ4SKI6f5d
— Sameer Allana (@HitmanCricket) March 27, 2024
व्हिडिओमध्ये पहिला भाग दाखवण्यात आला आहे ज्यामध्ये चाहता (फॅन) कोहलीच्या पाया पडतो आणि त्यानंतर दुसऱ्या भागात सुरक्षा कर्मचारी त्याला मैदानाबाहेर घेऊन जातात आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात करतात. यावेळी पोलीस कर्मचारीही उपस्थित होते.
या घटनेसाठी अनेक जण आरसीबीला जबाबदार धरत आहेत. मात्र या व्हिडीओबाबत कर्नाटक क्रिकेट संघाकडून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे व्हायरल होत असलेला व्हिडीओ खरा आहे की खोटा हे सांगणं कठीण आहे.