IPL 2024 ( #DCvPBK Match 2, Mohali ) – आयपीएलच्या १७व्या हंगामाचे दणक्यात उद्घाटन झाल्यानंतर शनिवारी होणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील दुसऱ्या सामन्यातून स्टार फलंदाज ऋषभ पंत अपघातातून सावरल्यानंतर मैदानावर पुनरागमन करणार आहे. तो तब्बल दीड वर्षांनंतर फलंदाजी करत असल्याने आपुसकच दिल्लीच्या चाहत्यांची उत्सुकता व त्याला पाहण्याची इच्छा शिगेला पोचली आहे. हा सामना दुपारी 3.330 वाजता सुरू होणार आहे.
या सामन्यासाठी दोन्ही संघ पंजाबमध्ये सराव करत आहेत. मोहालीच्या महाराजा यादवेंद्र सिंह स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. या नव्या स्टेडियममध्ये प्रथमच आयपीएलचा सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांनी आजपर्यंत आयपीएलचे जेतेपद पटकावलेले नाही. अशा स्थितीत दिल्ली आणि पंजाब या दोन्ही संघांना यंदाच्या मोसमाची धमाकेदार सुरुवात करण्याची संधी आहे.
दिल्ली कॅपिटल्सची कमान पुन्हा ऋषभ पंतकडे सोपविताना फ्रँचायजीने त्याच्यावर विश्वास दर्शविलेला आहे. तर पंजाबचे नेतृत्व शिखर धवनकडे आहे. चाहत्यांना मोहालीतील रोमांचक सामन्याची अपेक्षा आहे, तर हा मोसमातील पहिला दुपारचा सामना असणार आहे. अशा परिस्थितीत मोहालीतील हवामान नक्कीच सामन्यात प्रभावी भूमिका बजाविणार आहे.
मोहालीच्या या स्टेडियमवर आयपीएलचे सामने खेळले गेलेले नाहीत, परंतु भारताच्या देशांतर्गत टी-20 स्पर्धेतील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे सामने नक्कीच खेळले गेले आहेत. या स्पर्धेत आतापर्यंत 23 सामने झाले आहेत. यापैकी 15 सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत, तर 8 सामने नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. येथील खेळपट्टीवर पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या १४८ धावांच्या आसपास आहे, तर दुसऱ्या डावाची सरासरी केवळ ११६ धावांची आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
#DCvPBK : दोन्ही संघाचे संभाव्य संघ…
दिल्ली कॅपिटल्स : ऋषभ पंत (कर्णधार), प्रवीण दुबे, डेव्हिड वॉर्नर, विकी ओस्तवाल, पृथ्वी शॉ, एनरिक नोरखिया, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ललित यादव, खलील अहमद, मिचेल मार्श, मी. शर्मा, यश धुल, मुकेश कुमार, ट्रिस्टन स्टब्स, रिकी भुई, कुमार कुशाग्रा, रसिक दार, झाय रिचर्डसन, सुमित कुमार, शाई होप, स्वस्तिक छिकारा.
पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, सिकंदर रझा, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, सॅम कुरान, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार, राहुल चहर. , हरप्रीत भाटिया, विद्वथ कावेरप्पा, शिवम सिंग, हर्षल पटेल, ख्रिस वोक्स, आशुतोष शर्मा, विश्वनाथ प्रताप सिंग, शशांक सिंग, तनय थियागराजन, प्रिन्स चौधरी, रिले रौसो.