Indian Premier League 2024 Live Cricket Score, CSK vs GT : आज IPL 2024 च्या सातव्या सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा सामना गुजरात टायटन्सशी झाला. हा सामना चेपॉक स्टेडियम, चेन्नई येथे खेळला गेला. चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने IPL 2024 मध्ये सलग दुसरा विजय नोंदवला. चेन्नईने शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरातचा 63 धावांनी पराभव केला.
प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 20 षटकांत 6 गडी गमावून 206 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात संघाला 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 143 धावा करता आल्या. या विजयासह रुतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघ चार गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. सीएसकेचा पुढील सामना 31 मार्च रोजी विशाखापट्टणम येथे दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. त्याचवेळी गुजरातचा पुढील सामना 31 मार्च रोजी अहमदाबादमध्ये सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे.
गुजरातच्या संघाची सुरुवात खराब झाली. शुभमन गिल (8) आणि रिद्धिमान साहा (21) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवून दीपक चहरने गुजरातला दोन मोठे धक्के दिले. यातून गुजरात संघाला सावरता आले नाही. त्यानंतर धोनीने विकेटच्या मागे घेतलेल्या शानदार झेलने विजय शंकरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याला 12 धावा करता आल्या. यानंतर रहाणेने डेव्हिड मिलरचा शानदार झेल घेतला. मिलरला 21 धावा करता आल्या. तर अजमतुल्ला उमरझाई 11 धावा केल्यानंतर, राहुल तेवतिया 6 धावा करून आणि रशीद खान एक धावा करून बाद झाला. उमेश यादव 11 चेंडूत 10 धावा करून तर स्पेन्सर जॉन्सन पाच धावा करून नाबाद राहिला.
चेन्नईकडून दीपक चहर, मुस्तफिजुर रहमान आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले. यादरम्यान तुषारने 21, दीपकने 28 आणि मुस्तफिझूरने 4 षटकात 30 धावा दिल्या. याशिवाय डॅरिल मिशेल आणि मथिशा पाथिराना यांना प्रत्येकी 1-1 असे यश मिळाले.
तत्पूर्वी, नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना शिवम दुबेचे झंझावती अर्धशतक व कर्णधार ऋतूराज गायकवाड, रचीन रवींद्र आणि डॅरेल मिशेल यांनी केलेल्या वादळी फलंदाजीच्या जोरावर आयपीएल स्पर्धेत मंगळवारी झालेल्या लढतीत चेन्न्ई सुपर किंग्जने 20 षटकांत 6 गडी गमावून 206 धावसंख्येपर्यत मजल मारली होती.
Innings Break!
Chennai Super Kings post an imposing total of 206/6 💛
Are we in for a high scoring thriller? Gujarat Titans’ chase coming up 🔜
Scorecard ▶️ https://t.co/9KKISx5poZ#TATAIPL | #CSKvGT pic.twitter.com/HZitQncv0o
— IndianPremierLeague (@IPL) March 26, 2024
चेन्नई सुपर किंग्जसाठी प्रथम, रचिन रवींद्रने 20 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 46 धावा करून चांगली सुरूवात केली . शेवटी समीर रिझवीने रशीद खानने दोन षटकार मारून संघाची धावसंख्या दोनशेजवळ नेली. यूपीच्या समीर रिझवीने सहा चेंडूंत दोन षटकारांच्या मदतीने 14 धावा केल्या.
या दोघांशिवाय शिवम दुबेने अवघ्या 22 चेंडूत अर्धशतक झळकावले. दुबेने 23 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 51 धावा केल्या. तर कर्णधार गायकवाडने 36 चेंडूत 5 चौकार अन् 1 षटकारासह 46 धावांची खेळी केली. अजिंक्य रहाणे पुन्हा फ्लॉप ठरला, पण त्याने कर्णधार रुतुराजसोबत दुसऱ्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली. रहाणे 12 चेंडूत 12 धावा करून बाद झाला.
डॅरिल मिशेलने 20 चेंडूत 2 षटकारासह 24 धावांची नाबाद खेळी खेळली. जडेजा 3 चेंडूत 7 धावा काढून नाबाद राहिला. गुजरातकडून गोलंदाजीत राशिदने दोन बळी घेतले. तर साई किशोर, स्पेन्सर जॉन्सन आणि मोहित शर्मा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.