मंचर, (प्रतिनिधी) – सहकारमहर्षी स्वर्गीय शंकरराव पिंपळे अण्णा यांचे आदर्शगाव गावडेवाडीच्या विकासात फार मोलाचे योगदान आहे. गावाच्या प्रत्येक घटकांचा विकास व्हावा. यासाठी त्यांनी प्रयत्न केले, असे मत सरपंच विजय गावडे यांनी व्यक्त केले.
आदर्शगाव गावडेवाडी येथील श्री दत्तगुरु शिक्षण प्रसारक मंडळाच्या हिरकणी विद्यालयात स्वर्गीय पिंपळे अण्णांचा अकरावा स्मृतीदिन निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सरपंच विजय गावडे बोलत होते. प्रगतशील शेतकरी राजू शिंदे याच्या अध्यक्षतेखाली स्वर्गीय पिंपळे अण्णांचा अकरावा स्मृतीदिन कार्यक्रम संपन्न झाला.
संस्था संचालक बाळासाहेब गावडे,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सोनाली गावडे, संस्था उपाध्यक्ष सुनील गावडे उपस्थित होते. सरपंच विजय गावडे म्हणाले की, गावाच्या विकासात अण्णांचे कार्य फार मोलाचे आहे. गावाच्या प्रत्येक घटकांचा विकास व्हावा. यासाठी अण्णांनी गावाला बरोबर घेऊन प्रत्येक घटकांचा विकास व्हावा.
यासाठी प्रयत्न केले. शेतकरी सुखी करण्यासाठी परदेशी जाऊन कोरडवाहू शेतीतून फळबाग लागवड करावी. यासाठी प्रयत्न केले. जलसंधारणाचे कामे वनराईच्या माध्यमातून होण्यासाठी लोकांचे मत परिवर्तन केल. नदीवरून उपसा सिंचन योजना राबविण्यात आली, सहकार क्षेत्रात देखील त्यांनी अनमोल कार्य केले. निवृत्ती हुले यांनी प्रास्तविक व सूत्रसंचालन केले.
हुतात्मा दिन व स्वर्गीय पिंपळे अण्णांना विनम्र अभिवादन करण्यात आले .या निमित्ताने विद्यार्थीनी निबंध स्पर्धा ,वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. विद्यार्थीनी आपली मनोगते व्यक्त केले. उपाध्यक्ष सुनील गावडे, राजू शिंदे यांनी मनोगत व्यक्त केली. गावडेवाडी ता. आंबेगाव येथील स्वर्गीय शंकरराव पिंपळे अण्णांच्या स्मृतीदिननिमित्त त्याच्या प्रतिमेला अभिवादन करताना सरपंच विजय गावडे आणि मान्यवर.