मंचर, (प्रतिनिधी) – अखिल भारतीय ग्राहक पंचायत आबेंगाव तालुक्याच्या अध्यक्षपदी देविदास काळे,संघटकपदी सुदाम भालेराव यांची निवड करण्यात आली. सदर नियुक्तीचे पत्र जिल्हा अध्यक्ष तुषार झेंडे पाटील यांनी दिले.
या कार्यक्रमाला मध्य महाराष्ट्र प्रांतचे अध्यक्ष बाळासाहेब औटी, मध्य महाराष्ट्र प्रांतचे उपाध्यक्ष विलास लेले ,जिल्हा संघटनमंत्री अशोकराव भोर,जिल्हा उपाध्यक्ष दिलीपराव बेंद्रे, जिल्हा सचिव ज्ञानेश्वर माऊली ऊंडे उपस्थित होते. तसेच आंबेगाव तालुक्यातील इतर पदाधिकारी यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
तालुका संघटकपदी सुदाम भालेराव, तालुका सचिवपदी संजय चिंचपुरे, कोषाध्यक्षपदी अतुल इंदोरे यांची निवड करण्यात आली.तालुका महिला अध्यक्षपदी आशा थोरात. तालुका महिला संघटकपदी रिचा शेवाळे यांची नियुक्ती केली.
या मिटिंग करिता जिल्हातील शहरी व ग्रामीण भागातील तेरा तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.जिल्हाच्या वतीने सचिव ज्ञानेश्वर ऊंडे यांनी आभार मानले.