IPL 2024 , CSK vs KKR Match Live Score Updates : आजचा आयपीएल सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. हाय व्होल्टेज सामन्यात, दोन्ही संघ चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 पासून भिडतील. CSK विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. सुरुवातीच्या दोन विजयानंतर सीएसकेला सलग दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. चेन्नईने आपला शेवटचा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळला, ज्यात त्याचा 6 विकेट्सने पराभव झाला. रुतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नईचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.
त्याचवेळी, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील केकेआर गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. केकेआरनं आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यांमध्ये विजयी पताका फडकवली आहे. सोमवारी केकेआरची नजर विजयी चौकारावर असेल. गेल्या दोन सामन्यात सामनावीर ठरलेल्या सुनील नरेनकडून कोलकाताला पुन्हा एकदा उत्तम कामगिरीची अपेक्षा असेल. सलामीवीर म्हणून त्याने तुफानी फलंदाजी करत प्रत्येकी एक-एक बळी घेतला आहे.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल हा चेन्नई सुपर किंग्जच्या बाजूनं लागला आहे. सीएसकेचा कर्णधार रुतुराज गायकवाड याने टाॅस जिंकून कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
🚨 Toss Update 🚨@ChennaiIPL win the toss & elect to field against @KKRiders
Follow the Match ▶️ https://t.co/5lVdJVscV0#TATAIPL | #CSKvKKR pic.twitter.com/l0uaAhGnob
— IndianPremierLeague (@IPL) April 8, 2024
दरम्यान, हेड-टू-हेड आकडेवारीबद्दल बोलायचे तर, KKR विरुद्ध CSK चे वर्चस्व आहे. आयपीएलच्या इतिहासात चेन्नई आणि कोलकाता संघ आतापर्यंत 29 वेळा भिडले आहेत. या कालावधीत चेन्नई सुपर किंग्जने 18 वेळा विजय मिळवला आहे. तर केकेआरने केवळ 10 सामने जिंकले आहेत. एका सामन्याचा निकाल लागला नाही. तर चेपॉकमध्ये दोन्ही संघ 10 वेळा भिडले आहेत. या कालावधीत चेन्नईने सात वेळा विजय मिळवला आहे.
Team India : मोहम्मद शमी कधी करणार पुनरागमन? आयपीएल दरम्यान त्याच्या फिटनेसबाबत समोर आली मोठी अपडेट…
पिच रिपोर्ट (खेळपट्टीचा अहवाल)
चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त आहे. आजही येथील खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करेल अशी अपेक्षा आहे. मात्र, सुरुवातीला नवीन चेंडूनेही येथे धावा केल्या जातात. अशा परिस्थितीत आज आपल्याला उच्च स्कोअरिंग सामना पाहायला मिळू शकतो.