IPL 2024 , CSK vs KKR Match Live Score Updates : आजचा आयपीएल सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. हाय व्होल्टेज सामन्यात, दोन्ही संघ चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 पासून भिडतील. CSK विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. सुरुवातीच्या दोन विजयानंतर सीएसकेला सलग दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. चेन्नईने आपला शेवटचा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळला, ज्यात त्याचा 6 विकेट्सने पराभव झाला. रुतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नईचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.
त्याचवेळी, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील केकेआर गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. केकेआरनं आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यांमध्ये विजयी पताका फडकवली आहे. सोमवारी केकेआरची नजर विजयी चौकारावर असेल. गेल्या दोन सामन्यात सामनावीर ठरलेल्या सुनील नरेनकडून कोलकाताला पुन्हा एकदा उत्तम कामगिरीची अपेक्षा असेल. सलामीवीर म्हणून त्याने तुफानी फलंदाजी करत प्रत्येकी एक-एक बळी घेतला आहे.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल हा चेन्नई सुपर किंग्जच्या बाजूनं लागला आहे. सीएसकेचा कर्णधार रुतुराज गायकवाड याने टाॅस जिंकून कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसकेचा कर्णधार गायकवाड म्हणाला की, वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराना या सामन्यासाठी उपलब्ध होणार नाही, तर मुस्तफिझूर रहमान परतला आहे. याशिवाय शार्दुल ठाकूर आणि समीर रिझवी यांचेही संघात पुनरागमन झाले आहे. दुसरीकडे, या सामन्यासाठी केकेआरने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
🚨 Toss Update 🚨@ChennaiIPL win the toss & elect to field against @KKRiders
Follow the Match ▶️ https://t.co/5lVdJVscV0#TATAIPL | #CSKvKKR pic.twitter.com/l0uaAhGnob
— IndianPremierLeague (@IPL) April 8, 2024
CSK vs KKR : दोन्ही संघाची प्लेइंग 11 खालीलप्रमाणे…
चेन्नई सुपर किंग्ज : रुतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे, महेश तिक्षना.
इम्पॅक्ट सब : शिवम दुबे, मोईन अली, शेख रशीद, मिचेल सँटनर, निशांत सिंधू.
कोलकाता नाइट रायडर्स : फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.
इम्पॅक्ट सब : सुयश शर्मा, अनुकुल रॉय, मनीष पांडे, रहमानउल्ला गुरबाज, साकिब हुसेन.
दरम्यान, हेड-टू-हेड आकडेवारीबद्दल बोलायचे तर, KKR विरुद्ध CSK चे वर्चस्व आहे. आयपीएलच्या इतिहासात चेन्नई आणि कोलकाता संघ आतापर्यंत 29 वेळा भिडले आहेत. या कालावधीत चेन्नई सुपर किंग्जने 18 वेळा विजय मिळवला आहे. तर केकेआरने केवळ 10 सामने जिंकले आहेत. एका सामन्याचा निकाल लागला नाही. तर चेपॉकमध्ये दोन्ही संघ 10 वेळा भिडले आहेत. या कालावधीत चेन्नईने सात वेळा विजय मिळवला आहे.