मुंबई – क्रिकेट मॅचदरम्यान जय पराजव्यतिरिक्त रोज मैदानात आणि मैदानाबाहेर काही स्पेशल होत असतं. कधी कॅमेरामनने टिपलेली काही दृश्य व्हायरल होतात तर कधी मैदानात अचानक आलेला फॅन व्हायरल होतो. कालच्या केकेआर आणि आरसीबीच्या मॅचदरम्यान देखील असाच एक प्रकार व्हायरल झालाय. मात्र हा प्रकार कोणत्या फॅन्सचा नसून कॉमेंट्री करणाऱ्या इंग्लंडच्या माजी खेळाडूचा आहे.
आयपीएल 2023 मधील कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात काल सामना पार पडला. या सामन्यादरम्यान चाहत्यांना अनेक रोमांचक क्षण पाहायला मिळाले. मात्र, केवळ मैदानावरच नाही तर मैदानाबाहेरही प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन झाले. आयपीएल कॉमेंट्री पॅनलचा एक भाग असलेल्या इंग्लंडचा माजी खेळाडू ग्रॅमी स्वानने चाहत्यांचे मनोरंजन केले. केआरकेच्या मॅचपूर्वी स्वानने आपल्या सहयोगी मित्रांसह थेट नागीण गाण्यावर ठेका धरला.
स्वानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. स्वानला सहकाऱ्यांनी नागीण गाण्याची स्टेप्स सांगताच स्वान गाण्यावर ठेका धरत नाचू लागल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. कॉमेंट्री ब्रेक दरम्यान कॉमेंट्री बॉक्समधील ही गोष्ट प्रेक्षकांना देखील चांगलीच आवडली आहे.
On camera masti on #hangout 💃🕺! Swanny is fun 😍 @Swannyg66 @rotalks @mantramugdh @JioCinema pic.twitter.com/vKqAXQ2kVh
— Reema Malhotra (@ReemaMalhotra8) April 6, 2023
या मॅचमध्ये केकेआरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमावून 204 धावा केल्या.आरसीबीकडून डेव्हिड विली आणि कर्ण शर्माने प्रत्येकी दोन बळी घेतले. त्याचवेळी सिराज, ब्रेसवेल आणि हर्षल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
प्रत्युत्तरात आरसीबीची सुरुवात चांगली झाली. विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिस यांनी पहिल्या विकेटसाठी 29 चेंडूत 44 धावांची भागीदारी केली. मात्र, पाचव्या षटकापासून सुनील नरेनने विराट कोहलीला क्लीन बोल्ड केल्याने सामन्याला कलाटणी मिळाली. यानंतर बंगळुरूचे फलंदाज कोलकात्याच्या फिरकीच्या जाळ्यात अडकले. कोहली 21, कर्णधार डुप्लेसिस 23, ब्रेसवेल 19 याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. आरसीबीचा डाव १७.४ षटकात १२३ धावांवर गारद झालाकेकेआरकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. त्याचवेळी सुयश शर्माने तीन विकेट घेतल्या. सुनील नरेनला दोन आणि शार्दुलला एक विकेट मिळाली.