IPL 2023 Auction – आयपीएल 2023 हंगामासाठी आज कोच्ची येथे खेळाडूंचा मिनी लिलाव सुरु आहे. यामध्ये खासकरून विदेशी खेळाडूंवर सर्वच फ्रेंचायझींच्या नजरा आहेत. या लिलावात 405 खेळाडूंवर बोली लावली जाणार असून त्यापैकी 87 खेळाडूंनाच निवडले जाणार आहे. त्याचबरोबर लिलावासाठी खेळाडूंच्या यादीत 273 भारतीय तर 132 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. दरम्यान, इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनला मोठी बोली लागणार असे म्हटले जात होते, त्याप्रमाणे त्याला आत्तापर्यंतच्या आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वाधिक बोली लागली आहे.
सॅम करनला आपल्या संघात घेण्यासाठी सर्वच फ्रेंचायझी इच्छुक होत्या. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने बोलिला सुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्या बाजूने मुंबई इंडियन्सने बोली लावण्यास सुरुवात केली. 7 कोटींच्या घरात बोली जाताच आरसीबीने माघार घेतली. त्यामुळे लगेच पंजाबने या बोलीमध्ये प्रवेश केला. बोली वाढत गेली आणि शेवटी 18 कोटी 50 लाख या किमतीवर बोली थांबली. शेवटी पंजाब फ्रेंचायझीने करनला आपल्या संघात घेण्यात यश मिळवले.
Record Alert 🚨
Sam Curran 𝙗𝙚𝙘𝙤𝙢𝙚𝙨 𝙩𝙝𝙚 𝙢𝙤𝙨𝙩 𝙚𝙭𝙥𝙚𝙣𝙨𝙞𝙫𝙚 𝙥𝙡𝙖𝙮𝙚𝙧 𝙚𝙫𝙚𝙧 𝙩𝙤 𝙗𝙚 𝙗𝙤𝙪𝙜𝙝𝙩 𝙞𝙣 𝙄𝙋𝙇!
He goes BIG 🤯- INR 18.50 Crore & will now play for Punjab Kings 👏 👏#TATAIPLAuction | @TataCompanies pic.twitter.com/VlKRCcwv05
— IndianPremierLeague (@IPL) December 23, 2022
या मिनी लिलावासाठी सनरायझर्स हैदराबादकडे सर्वाधिक 42.25 कोटी शिल्लक आहेत, तर केकेआरकडे सर्वात कमी 7.05 कोटी आहेत. याशिवाय पंजाब किंग्जकडे 32.2 कोटी, लखनऊ सुपरजायंट्सकडे 23.35 कोटी, मुंबई इंडियन्सकडे 20.55 कोटी, चेन्नई सुपर किंग्सकडे 20.45 कोटी, दिल्ली कॅपिटल्सकडे 19.45 कोटी, गुजरात टायटन्सकडे 19.25 कोटी, राजस्थान रॉयल्सकडे 13.2 कोटी आणि बंगळुरूकडे 8.75 कोटी रुपये उपलब्ध होते.