दुबई – अफगाणिस्तानचा गुणवान गोलंदाज रशीद खानने आपल्या कारकिर्दीत एक अनोखा टप्पा पार केला. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये रशीदने 400 बळी पूर्ण केले आहेत. अशी कामगिरी करणारा चौथा गोलंदाज ठरला आहे.
टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात मार्टिन गुप्टिलला बाद करताच रशीदचे टी-20 क्रिकेटमध्ये 400 गडी पूर्ण झाले आहेत.
रशीदने 289 सामन्यात 400 बळी नोंदवले. वेस्ट इंडिजचा ड्वेन ब्रावो याच्या नावावर सर्वाधिक बळी नोंदलेले आहेत. त्याने 553 गडी बाद केले आहेत. वेस्ट इंडिजच्याच सुनील नरेनच्या नावावर 425 बळी आहेत.