नगर -संगमनेर शहरात एक महिला, तर संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील चार जण, असे पाच जण करोनाबाधित आढळून आल्यानंतर अवघ्या काही तासांतच उर्वरित पाच पैकी दोन व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून दोन्ही व्यक्ती करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दिवसभरात जिल्ह्यात एकूण सात रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या 52 वर गेली आहे.
अहवालानुसार बाधित व्यक्तीमध्ये 28 वर्षीय महिला आणि 5 वर्षीय मुलाचा समावेश आहे. हे दोन्ही बाधित धांदरफळ येथील आहेत. आता आढळून आलेल्या दोन बाधित व्यक्ती या काल मृत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईक आहेत. दरम्यान काल मृत्यू झालेल्या व्यक्तीचा अहवाल अद्याप प्रलंबित असून, धांदरफळ येथील बाधित व्यक्ती या मृत व्यक्तीच्या नात्यातील आहेत, तर संगमनेर येथील महिलेला न्यूमोनियाचा त्रास होत असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी तिचा घशातील स्त्राव चाचणीसाठी पुण्याला पाठविण्यात आला होता. त्यात महिलेला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. धांदरफळ येथील
संगमनेर शहरातील काही भाग आणि धांदरफळ बु. 22 मे पर्यंत हॉटस्पॉट
संगमनेर शहरातील ईस्लामपुरा, कुरण रोड, बिलालनगर, अपनानगर, पानसरे आखाडा, गुंजाळ आखाडा, पुनर्वसन कॉलनी, पावबाकी रस्ता, ज्ञानमाता विद्यालय परिसर, तसेच कुरण (संगमनेर तालुका) व धांदरफळ बु. (संगमनेर तालुका) हे क्षेत्र हॉटस्पॉट पॉकेट घोषित करण्यात आले आहेत. या क्षेत्राच्या मध्यबिंदूपासून जवळपास दोन कि.मी.चा परिसर हा कोअर एरिया म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी घोषित केला आहे. या क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री इत्यादी शनिवार 9 मे रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 22 मे, रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
संगमनेर, धांदरफळची जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांकडून पाहणी
धांदरफळ येथील सहा, तर संगमनेरात एक, अशा सात व्यक्ती करोनाबाधीत आढळल्याने संगमनेर पुन्हा हादरले आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी राहुल दिवेद्वी व जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी संगमनेरसह धांदरफळ बुद्रुक येथे भेट देवून पाहणी केली.
संगमनेरचा जाहीर झालेला हॉटस्पॉट व धांदरफळ बुद्रुक प्रतिबंधात्मक क्षेत्र येथे आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याची तंबी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिली आहे. यावेळी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, पोलीस उपविभागीय अधिकारी रोशन पंडित, शहर पोलीस निरीक्षक अभय परमार, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप आदी उपस्थित होते.
बाधितांत 29 वर्षीय आणि 15 वर्षीय युवक, तर 25 आणि 19 वर्षीय युवती यांचा समावेश आहे. दरम्यान, जे 23 अहवाल निगेटिव्ह आले आहेत, त्यात धांदरफळ येथील आठ, संगमनेर येथील चार, पारनेर -एक, राहाता-एक, अकोले- एक, नगर-दोन, जामखेड -दोन, कोपरगाव- एक आणि श्रीरामपूर येथील तिघांच्या अहवालाचा समावेश आहे.