World Cup 2023 Pakistan vs Afghanistan Match Toss Update & Playing 11 :- विश्वचषकाच्या 22व्या सामन्यात पाकिस्तानसमोर अफगाणिस्तानचे आव्हान आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.
गेल्या दोन सामन्यांत पाकिस्तान संघाचा पराभव झाला आहे. भारतानंतर ऑस्ट्रेलियानेही त्याचा पराभव केला आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तानला गेल्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला आहे. मात्र, इंग्लंडचा पराभव करत अफगाणिस्तान संघानं स्पर्धेत मोठा उलटफेर केला आहे. अशा स्थितीत पाकिस्तानने त्यांंना कमी लेखणे चूकीचे ठरेल.
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने संघात एक बदल केला. मोहम्मद नवाजच्या जागी उपकर्णधार शादाब खानचे पुनरागमन झाले आहे. तापामुळे नवाज या सामन्यात खेळू शकला नाही.
#PAKvsAFG दोन्ही संघांचे प्लेइंग-11 खालीलप्रमाणे :-
अफगाणिस्तान :- रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झदरन, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला उमरझाई, इक्रम अलीखिल (विकेटकीपर), मोहम्मद नबी, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन उल हक, नूर अहमद.
पाकिस्तान :- अब्दुल्ला शफीक, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, उसामा मीर, शाहीन आफ्रिदी, हसन अली, हरिस रौफ.
त्याचवेळी अफगाणिस्ताननेही संघात एक बदल केला आहे. वेगवान गोलंदाज फजलहक फारुकीच्या जागी नूर अहमदचा समावेश करण्यात आला आहे.