मुंबई – ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री सई लोकुरच्या (Sai Lokur) घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना आई होणार असल्याची बातमी सांगितली होती. या पोस्टनंतर तिच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छा वर्षाव करण्यात आला. सध्या सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या सईने तिचे डोहाळे जेवणाचे काही फोटो शेअर केले आहेत.
सईने या कार्यक्रमासाठी जांभळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. या लुकमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. सईच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात तिच्या जवळच्या मैत्रिणी सहभागी झाल्या होत्या. त्यांनी सईसाठी खास तयारी केली होती. हे फोटो शेअर करत “मला एखाद्या राजकुमारीसारखं वाटतंय”, असं सईने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. सध्या सईचे हे फोटो चाहत्यांच्याही पसंतीस पडत आहे.
दरम्यान, सईने नोव्हेंबर 2020 मध्ये तीर्थदीप रॉयसोबत लग्नगाठ बांधली होती. सईने बंगाली आणि मराठी पद्धतीने लग्न केले होते. लग्नानंतर आता दोन वर्षांनी सई आणि तीर्थदीप आई-बाबा होणार आहेत. बाळाचे स्वागत करण्यासाठी दोघे आतुर आहेत. सध्या सई गरोदरपण एंजॉय करत आहे. अनेक मजेशीर व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते.