सोरतापवाडी – कोरेगावमुळ ग्रामपंचायतीने गणेश विसर्जनाची जय्यत तयारी केली असुन विसर्जन घाटाची पाहणी उरुळी कांचन दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार यांनी केली . कोरोना संसर्गाचा धोका असल्याने विसर्जनावेळी गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे दादाराजे पवार यांनी सांगितले. यावेळी पवार यांनी विसर्जन तयारीचा ग्रामपंचायत मध्ये आढावा घेतला. नदीकाठावरील घाटाची पाहणी केली.
गणेशमूर्ती विसर्जनासाठी ग्रामस्थांना माहिती दिली . यावेळी पोलिस उपनिरीक्षक सदाशिव गायकवाड , कोरेगाव मुळचे सरपंच विठ्ठल शितोळे, उपसरपंच मनीषा कड पोलीस पाटील वर्षा कड तंटामुक्तीचे अध्यक्ष संपत डिंबळे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय काकडे ,सामाजिक कार्यकर्ते सचिन कड ,नंदकिशोर कड गणेश मंडळाचे अध्यक्ष , उपाध्यक्ष , कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते .
कोरेगाव मुळ येथे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जात असुन कोरोनामुळे यंदा गणेशोत्सावर निर्बंध आहेत. त्यात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे . त्यामुळे गणेश विसर्जनावेळी गर्दी टाळण्याचे आवाहन सरपंच विठ्ठल शितोळे यांनी केले . यावेळी नुकतीच कोरेगाव मुळ तंटामुक्तीच्या अध्यक्षपदी संपत डिंबळे यांची निवडी झाल्याबद्दल पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .