#INDvWI : हेटमायर, होपची शतके; विंडीजचा भारतावर विजय

चेन्नई : शिमरन हेटमायर आणि शाइ होपच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर विंडीजने भारतावर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह वेस्ट इंडिजने तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

विजयासाठीचे २८८ धावांचे लक्ष्य विंडीजने ४७.५ षटकांत २ बाद २९१ धावा करत पूर्ण केले व भारतावर एकतर्फी विजय मिळवला. वेस्टइंडिज सुरूवात खराब झाली. त्यांची पहिली विकेट अवघ्या ११ धावांवर पडली. दीपक चहरने सुनील एम्ब्रिसला ९ धावांवर बाद करत विंडीजला पहिला धक्का दिला. त्यानंतर शिमरन हेटमायर आणि शाइ होपने दुस-या विकेटसाठी २१८ धावांची भागिदारी करत विंडीजचा विजय निश्चित केला. हेटमायरला मोहम्मद शमीने अय्यरकरवी बाद करत ही जोडी फोडली. हेटमायरने १०६ चेंडूत ११ चौकार व ७ षटकारासह १३९ धावांची खेळी केली. त्यानंतर होपने निकोलस पूरनच्या साथीन ६२ धावाची भागिदारी करत वेस्टइंडिजच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. शाइ होपने १५१ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारासह नाबाद १०२ आणि निकोलस पूरनने नाबाद २९ धावांची खेळी केली. भारताकडून चहर आणि शम्मीनं प्रत्येकी १ गडी बाद केला.

तत्पूर्वी, वेस्टइंडिज कर्णधार कायरन पोलार्डने नाणेफेक जिंकत भारतास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होतं. प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरूवात खराब झाली. केएल राहुल ६ आणि कर्णधार विराट कोहली ४ धावांवर झटपट बाद झाले, तेव्हा भारताची २ बाद २५ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर रोहित आणि श्रेयसने डाव सावरला आणि तिस-या विकेटसाठी ५५ धावा जोडल्या. रोहित शर्मा ३६ वर असताना जोसेफने त्याला झेलबाद केलं. त्यानंतर अय्यर आणि पंतने चौथ्या विकेटसाठी ११४ धावा जोडत संघाची धावसंख्या १९४ पर्यत नेली.

श्रेयस अय्यरने ८८ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकारासह ७० आणि रिषभ पंतने ६९ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारासह ७१ धावांची खेळी केली. त्यानंतर केदार जाधवने ४०, रविंद्र जडेजा २१, शिवम दूबे ९ आणि दीपक चहरने ७ धावा करत संघाची धावसंख्या २८८ पर्यंत नेली.

वेस्टइंडिज कडून गोलंदाजीत शेल्डन काॅटरेलने १० षटकात ४६ धावा देत २ गडी बाद केले. कीमो पाॅल आणि अलजारी जोसेफ यांनी प्रत्येकी २ गडी तर कायरन पोलार्डने १ गडी बाद केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)