सेंच्युरीयन – पहिल्या कसोटीत वेगवान गोलंदाज लुंगी एन्जीडीच्या चेंडूवर मयंक आग्रवालविरुद्ध पायचीतचे जोरदार अपील करण्यात आले. मैदानावरील पंचाने फेटाळून लावल्यावर दक्षिण आफ्रिकेने डीआरएस घेतला.
त्यात तिसऱ्या पंचाने रिप्ले तसेच सर्व गोष्टींची पडताळणी करुन तो बाद असल्याचा निर्णय दिला. त्यामुळे आता या निर्णयावर टीका होत आहे.
डीआरएसच्या नियमाप्रमाणे चेंडूचा निम्म्यापेक्षा जास्त हिस्सा यष्टींना आदळेल असे दिसून आले तरच तो फलंदाज बाद दिला जातो मात्र, इथे मयंकच्या पॅडला लागलेला चेंडू यष्टीवर फारतर 10 टक्के प्रमाणात स्पर्श करेल असे स्पष्ट दिसत होते.
तरीही त्याला बाद दिले गेले. त्यामुळे या कसोटीत पुन्हा एकदा सुमार पंचगिरी दिसून आल्याची टीका काही समालोचकांनीही केली.