#INDvENG 4 th Test : बुमराह, सुंदर यांना वगळणार

चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात बदल

अहमदाबाद – इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात दोन बदल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. जसप्रीत बुमराह याने वैयक्तिक कारणाने या सामन्यातून माघार घेतली असल्याने तसेच वॉशिंग्टन सुंदरचीही कामगिरी तिसऱ्या कसोटीत फारशी चमकदार कामगिरी केली नसल्याने त्यांच्या जागी वेगवान गोलंदाज उमेश यादवचा तर सुंदरच्या जागी कुलदीप यादवच्या समावेशाची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

चौथा कसोटी सामना हा दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदल केले जाणार असल्याचे बोलले जात आहे. उमेशने काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयची तंदुरूस्ती चाचणीत आपण फिट असल्याचे सिद्ध केल्याने त्याचा 14 खेळाडूंच्या संघात समावेश करण्यात आला असल्याने बुमराहच्या जागी त्यालाच संधी मिळू शकते.

सुंदरच्या जागी कुलदीपला संधी मिळू शकते. कुलदीपला दुसऱ्या कसोटी सामन्यात संधी देण्यात आली होती. पण या सामन्यात कुलदीपला चमकदार कामगिरी करता आली नसली तरी अहमदाबादची खेळपट्टी फिरकी गोलंदाजीला साथ देणारीच ठरेल असे संकेत मिळत असल्यामुळे भारतीय संघ तीन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरेल. येथील खेळपट्टीवरून तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला असल्यामुळे या सामन्यासाठी खेळपट्टी कशी असेल यावर आता चर्चा सुरू झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.