जकार्ता, प्रेट्र :- भारताचे लक्ष्य सेन आणि प्रियांशू राजावत गुरुवारी येथे प्री-क्वार्टर फायनलमध्ये सरळ गेममध्ये पराभूत होऊन BWF वर्ल्ड टूर सुपर 500 इंडोनेशिया मास्टर्सच्या पुरुष एकेरीच्या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. आता एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेल्या किरण जॉर्जच्या रूपात भारतासमोर एकमेव आव्हान उरले आहे.
सेनने आठव्या मानांकित अँडर्स अँटोन्सेनविरुद्ध कडवे आव्हान उभे केले, परंतु डॅनिश खेळाडूकडून 19-21, 18-21 असा पराभव पत्करावा लागला. पहिल्या फेरीत सेनने चीनच्या वेंग होंगयांगचा 24-22, 21-15 असा पराभव केला होता.
दुसरीकडे प्रियांशू राजावतलाही पराभव पत्करावा लागला आहे. राजावतने कॅनडाच्या ब्रायन यांगविरुद्ध सुरुवातीच्या गेममध्ये चांगली कामगिरी केली, पण ती पुरेशी ठरली नाही आणि तो 18-21, 14-21 असा पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडला. राजावतने पहिल्या फेरीत डेन्मार्कच्या रास्मस गेमकेचा 21-18, 21-19 असा पराभव केला होता.
Australian Open 2024 : वर्ल्ड नंबर-1 जोकोविचला पराभवाचा धक्का, स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात…
किरण जॉर्ज उपांत्यपूर्व फेरीत…
आता या स्पर्धेत किरण जॉर्ज हा एकमेव भारतीय खेळाडूचे आव्हान अजूनही उरले आहे. किरण जॉर्जने दुसऱ्या फेरीत चीनच्या लू गुआंग जूचा 21-11, 13-21, 21-18 असा पराभव केला. पहिल्या फेरीत त्याने फ्रान्सच्या टोमा ज्युनियर पोपोव्हचा 18-21, 21-16, 21-19 असा पराभव केला होता. आता उपांत्यपूर्व फेरीत (quarter-finals) आज (5.20PM) किरणचा सामना थायलंडच्या कुनलावतशी होणार आहे.