जकार्ता : इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये एका मोठ्या मशिदीला भीषण आग लागली असल्याचे घटना समोर आली आहे. या आगीच्या दुर्घटनेनंतर मशिदीची इमारत चक्क जमीनदोस्त झझाल्याचे सांगण्यात येत आहे. जकार्ता इस्लामिक सेंटरच्या परिसरातील ही मशीद आहे. मात्र या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
इंडोनेशियातील जकार्ता येथील इस्लामिक सेंटर मशिदीला भीषण आग लागली. आगीमुळे मशिदीचा घुमट पत्त्यांसारखा कोसळला ही आग फार भीषण होती. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात कोणातीही जीवितहानी झालेली नाही. मशिदीच्या घुमटाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असताना ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. ही आग इतकी वेगाने पसरली की काही वेळात मशिदीचा घुमट जमीनदोस्त झाला.
Giant dome of Jakarta Islamic Centre Grand Mosque collapses after fire breaks out
Read @ANI Story | https://t.co/rYeIo5XYTq#Indonesia #MosqueCollapse #JakartaIslamicCentreGrandMosque pic.twitter.com/bzEDo1UGPN
— ANI Digital (@ani_digital) October 20, 2022
आगीमुळे मशिदीचा घुमट जळून खाक झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. इंडोनेशियन मीडियानुसार, स्थानिक वेळेनुसार दुपारी तीन वाजता अग्निशामक दलाला आग लागल्याची सूचना देण्यात आली. यानंतर अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पण आग इतकी भीषण होती की संपूर्ण घुमटात पसरली आणि मशीद कोसळली घुमटाला आग कशी लागली याबाबत कोणतेही अधिकृत माहिती जारी करण्यात आलेली नाही. मात्र, माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मशिदीमध्ये नूतनीकरणाचे काम सुरू होते. यादरम्यान आग लागली असावी, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मशिदीचा घुमटाला आग लागली तेव्हा आग विझवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात होते. मात्र, आग वाऱ्यामुळे आग मोठी झाली. आग लागल्या तेव्हा सुरुवातीला परिसरातील लोकांना बाहेर काढण्यात आले. त्यामुळे घुमट पडल्यावर कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.