मुंबई :– दुबईहून मुंबईला येणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइटमध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दोन प्रवाशांनी केबिन क्रू आणि सहप्रवाशांशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर दोन्ही प्रवाशांना मुंबईत अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, याप्रकरणी एअरलाइन इंडिगोच्या वतीने तक्रार करण्यात आली होती, त्यानंतर एफआयआर नोंदवून दोन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली होती. मात्र, येथे त्यांना न्यायालयातून जामीन मिळाला आहे.
दोन्ही आरोपी हे कोल्हापूर आणि पालघरमधील नालासोपारा येथील रहिवासी आहेत. एक वर्ष आखाती देशात काम करून ते परतत होते.
विमानतळ अधिकाऱ्याने सांगितले की, दोन्ही आरोपी देशात परतल्याच्या आनंदात दारू पीत होते. दत्तात्रेय बापर्डेकर आणि जॉन जॉर्ज डिसोझा अशी त्यांची नावे आहेत. जेव्हा इतर प्रवाशांनी त्यांच्या गोंधळावर आक्षेप घेतला तेव्हा त्यांनी त्यांना आणि हस्तक्षेप करणाऱ्या क्रू सदस्यांना शिवीगाळ केली.
या दोघांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम (इतरांच्या जीवाला किंवा सुरक्षिततेला धोका निर्माण करणे) आणि विमान वाहतूक नियमांच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे सहार पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले.
जयसिंघानीच्या अटकेनंतर BCCI ची क्रिकेटपटूंना सूचना,”कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी..”
दरम्यान, प्रवाशांनी विमानात गैरवर्तन केल्याची या वर्षातील ही सातवी घटना असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यापूर्वी, 11 मार्च रोजी लंडन-मुंबई फ्लाइटच्या टॉयलेटमध्ये धुम्रपान केल्याबद्दल आणि आपत्कालीन एक्झिट उघडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती.