Indigo Flight – विमानाने प्रवास करणे हे ‘स्टेटस सिम्बॉल’ पेक्षा कमी नाही. त्यामुळे विमानाने प्रवास करताना सर्व काही परिपूर्ण असावे असे प्रवाशांना वाटते. कारण तिकिटाची किंमतही तशीच असते. अशात स्वच्छतेपासून ते सीट आणि इतर गोष्टींपर्यंत सर्वच गोष्टी प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.
#Indigo !! #Flight 6E 6798 !! Seat no 10A ! Pune to Nagpur!!! Today’s status … Best way to increase profit 😢😢…Pathetic … pic.twitter.com/tcXHOT6Dr5
— Subrat Patnaik (@Subu_0212) November 25, 2023
त्यामुळे ‘इंडिगो’ फ्लाइटमध्ये एका प्रवाशाला तुटलेली सीट दिसली, तेव्हा त्याने इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केला आणि हे प्रकरण इंटरनेटवर व्हायरल झाले. इतर वापरकर्त्यांनी देखील याबद्दल त्यांचे अनुभव शेअर केले आणि म्हणाले,’मला विश्वास बसत नाही की हे विमानात देखील होऊ शकते. बरं, या संपूर्ण प्रकरणावर युजर्सच्या प्रतिक्रिया येत आहे.
हा फोटो मायक्रोब्लॉगिंग साइट X वर @Subu_0212 ने २६ नोव्हेंबर रोजी पोस्ट केला आणि लिहिले ,’इंडिगो. फ्लाइट 6E 6798!! आसन क्रमांक 10A! पुणे ते नागपूर !!! आजची परिस्थिती… नफा वाढवण्याचा उत्तम मार्ग… अतिशय निरुपयोगी…’ दरम्याम या पोस्टला आतापर्यंत 13 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि सत्तरहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
या प्रकरणावर आणखी एका युजरने काही फोटो शेअर करत लिहिले,’जरा आंतरराष्ट्रीय फ्लाइटच्या सीटची स्थिती पहा. आपण शांतपणे जेवू शकत नाही, ट्रे तुटलेला आहे आणि यामुळे अन्न आणि पेयांचे कप सतत घसरत आहेत. खूप वाईट अनुभव आणि ते बरोबर करत नाहीत.’