नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील अयोध्येतील महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धामचे उद्घाटन केले. त्यानंतर इंडिगोचे पहिले विमान दिल्लीहून महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धामसाठी रवाना झाले.
प्रवाशांनी जय श्री रामच्या दिल्या घोषणा –
दिल्लीहून अयोध्या धामला पहिले विमान रवाना होण्यापूर्वी इंडिगोचे पायलट कॅप्टन आशुतोष शेखर यांनी प्रवाशांचे स्वागत केले. यादरम्यान विमानातील लोकांनी ‘जय श्री राम’च्या घोषणाही दिल्या.
#WATCH | IndiGo pilot captain Ashutosh Shekhar welcomes passengers as the first flight takes off from Delhi for the newly constructed Maharishi Valmiki International Airport, Ayodhya Dham, in Ayodhya, UP. pic.twitter.com/rWkLSUcPVF
— ANI (@ANI) December 30, 2023
1450 कोटी रुपये खर्चून विकसित केले विमानतळ –
अयोध्येतील महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धामचे पंतप्रधान मोदींनी आज उद्घाटन केले. या विमानतळाचा टप्पा-1 1450 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित करण्यात आला आहे. विमानतळ टर्मिनल इमारतीचे क्षेत्रफळ 6500 चौरस मीटर असेल, जे दरवर्षी सुमारे 10 लाख प्रवाशांना सेवा देण्यासाठी सुसज्ज असणार आहे.