Pm Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज प्रभू श्रीरामाची नागरी अयोध्येच्या (Ayodhya) दौऱ्यावर आहेत. आज ते इथे विविध विकासकामांचे उदघाटन करणार आहेत. त्यातील एक म्हणजे अयोध्येतील ‘अयोध्याधाम रेल्वे स्टेशन’. हे रेल्वे स्टेशन आजपासून प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे.
जानेवारीत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान मोदी देशवासियांना खास भेट देत आहेत. याअंतर्गत अयोध्येला नवीन रेल्वे स्थानकाची भेटही मिळाली आहे. ‘अयोध्या धाम रेल्वे स्थानक’ अनेक आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी जनतेशी सवांद देखील साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 140 कोटी देशवासियांना 22 जानेवारी रोजी घरोघरी दिवे प्रज्वलित करण्याचे आवाहन केले. दिवाळी साजरी करा. 22 जानेवारीची संध्याकाळ पूर्णपणे चकाकणारी असावी. आज संपूर्ण जग 22 जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे.
14 जानेवारीपासून मकर संक्रांतीनिमित्त प्रत्येक मंदिराच्या कानाकोपऱ्यात लहान-मोठे स्वच्छता अभियान राबविण्यात यावे. प्रभू राम सर्वांचा आहे, आमचे एकही मंदिर अस्वच्छ नसावे. असं आव्हान पंतप्रधान मोदींनी यावेळी केलं.
ते पुढे म्हणाले, अयोध्येतील लोकांमध्ये हा जल्लोष आणि उत्साह अतिशय स्वाभाविक आहे. मी मातीच्या प्रत्येक कणाचा आणि भारतातील लोकांचा पूजक आहे. मीही तुमच्यासारखाच उत्सुक आहे.
एक काळ असा होता की याच अयोध्येत राम लल्ला तंबूत बसले होते आणि आज केवळ रामलल्लालाच घर नाही तर देशातील चार कोटी गरीब लोकांनाही कायमस्वरूपी घर मिळाले आहे. असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.