हरिकृष्णा संयुक्‍त तिसऱ्या स्थानी

चेन्नई –सेंट ल्युईस रॅपिड व ब्लिट्‌झ ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा अव्वल खेळाडू पी. हरिकृष्णा याने संयुक्‍तपणे तिसरे स्थान मिळवले आहे.

या स्पर्धेला बुधवारपासून प्रारंभ झाला. त्यात तिसऱ्या फेरीअखेर हरिकृष्णाने अर्मेनियाचा ग्रॅण्डमास्टर लेव्हन अरोनियन याच्यासह संयुक्‍तपणे तिसरे स्थान प्राप्त केले. पहिल्या व दुसऱ्या फेरीत त्याने विजय मिळवला होता. मात्र, तिसऱ्या फेरीत त्याला बरोबरीवर समाधान मानावे लागले.

त्याने अमेरिकेचा ग्रॅण्डमास्टर लेनिनिअर डोमिंगोजवर मात केली. त्यानंतरच्या फेरीत त्याने रशियाच्या अलेक्‍झांडर ग्रिश्‍चुकवर विजय मिळवला.

Leave A Reply

Your email address will not be published.