Tokyo Olympics : पिछाडीनंतरही दीपिकाचा विजय

टोकियो – टोकियो ऑलिम्पिकमध्ये बुधवारी भारताची अव्वल तिरंदाज दिपीका कुमारी हिने उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. तिने अंतिम 16 खेळाडूंमध्ये स्थान मिळवताना अमेरिकेच्या जेनिफर मुसिनो फर्नांडिस हीचा 6-4 असा पराभव केला.

या सामन्यात पहिला सेट दिपीकाने गमावला होता. त्यानंतर तीने ही पिछाडी भरून काढताना अविश्‍वसनीय विजयाची नोंद केली.

2009 साली युवा विश्‍वचषक स्पर्धेत वयाच्या 15 व्या वर्षी दिपीकाने विजेतेपद पटकावले होते तेव्हापासून तिने आपल्या कामगिरीत सातत्य राखले आहे.

गेल्या पाच वर्षांत दिपीकाने पाच जागतिक स्पर्धांमध्ये तिने पदके पटकावली असून यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेतही तिच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा केली जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.