रशियाने दिला पाकिस्तानला झटका
नवी दिल्ली : भारताच्या कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाला पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर नेवून स्वत:ची गोची केल्याचे दिसत आहे. कारण एका पाठोपाठ एका बड्या राष्ट्राने भारताच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. त्यातच आता जागतिक स्तरावर महाशक्ती असणाऱ्या रशियानेदेखील पाकिस्तानला झटका दिला आहे. भारताने जम्मू-काश्मीरमधील 370 कलम रद्द करण्याचा निर्णय त्यांच्या घटनेनुसार असल्याचे म्हटले आहे.
Ministry of Foreign Affairs of Russia: Russia is a consistent supporter of normalization of relations between India and Pakistan.We hope that the differences between them will be resolved by political and diplomatic means on a bilateral basis (3/3)
— ANI (@ANI) August 10, 2019
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताच्या निर्णयाचे समर्थन करत भारताने जम्मू -काश्मीर राज्याचे विभाजन करण्याचा निर्णय हा त्यांच्या घटनेप्रमाणे असल्याचे म्हटले आहे. तसेच भारताच्या या निर्णयामुळे दोन्ही देशांनी एकमेकांच्या संबंधावर कोणताही परिणाम होऊ देवू नये असेही म्हटले आहे. भारताच्या निर्णयाने जम्मू काश्मीरमध्ये नवीन बदल पाहायला मिळतील अशी अपेक्षा देखील रशियाकडून व्यक्त करण्यात आली आहे.