Commbank Women’s ODI Series 2024 : भारतीय महिला क्रिकेट संघ वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. बांगलादेशमध्ये होणाऱ्या महिला टी-20 विश्वचषकानंतर ही मालिका आयोजित केली जाईल. या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
महिला संघ डिसेंबर 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. याची सुरुवात 5 डिसेंबरपासून ब्रिस्बेनमधील ॲलन बॉर्डर मैदानावर होणाऱ्या एकदिवसीय सामन्याने होईल. शेवटचा सामना 8 डिसेंबरला पर्थमध्ये होणार आहे. वनडे मालिका खूप महत्त्वाची असणार आहे. मालिकेतील पहिला आणि तिसरा एकदिवसीय सामना दिवस-रात्र स्वरूपात खेळवला जाईल.
जानेवारी 2024 नंतर ऑस्ट्रेलिया आणि भारतीय महिलांमधील हा पहिला सामना असेल. जानेवारीत झालेल्या T20 आंतरराष्ट्रीय मालिका आणि एकदिवसीय मालिकेत दोन्ही संघ शेवटच्या वेळी आमनेसामने आले होते. या दोन्ही मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकल्या होत्या. ॲलिसा हिलीच्या नेतृत्वाखालील संघाने टी-20 मध्ये भारताचा 2-1 आणि एकदिवसीय सामन्यात 3-0 असा पराभव केला.
INDW vs AUS W : तीन एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक
पहिला सामना : 5 डिसेंबर (ॲलन बॉर्डर मैदान,ब्रिस्बेन)
दुसरा सामना : 8 डिसेंबर (ॲलन बॉर्डर मैदान,ब्रिस्बेन)
तिसरा सामना 11 डिसेंबर (वाका मैदान, पर्थ)