Sensex Closing Bell – व्यावसायिक वर्ष 2024 च्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात बाजारात उत्साह होता. सेन्सेक्स आणि निफ्टी वाढीसह बंद करण्यात यशस्वी झाले. गुरुवारी बीएसईचे सर्व क्षेत्र हिरव्या रंगात बंद झाले. मिडकॅप शेअर्समध्येही खरेदी दिसून आली. PSE, फार्मा आणि ऑटो शेअर्समध्ये खरेदी दिसून आली तसेच मेटल, इन्फ्रा आणि एफएमसीजी निर्देशांक वाढीसह बंद झाले.
निफ्टीने इंट्राडे 22,500 चा टप्पा ओलांडला पण त्याच्या वर टिकण्यात यश आले नाही. सेन्सेक्सही इंट्राडे 74,000 पार करण्यात यशस्वी झाला होता. दिवसाच्या शेवटच्या तासात दोन्ही निर्देशांक जवळपास 1% घसरले.
आज बाजार कोणत्या पातळीवर बंद झाला?
गुरुवारी दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स 655 अंकांनी वाढून 73,651 वर आणि निफ्टी 203 अंकांनी वाढून 22,327 वर बंद झाला. निफ्टी बँक 339 अंकांच्या वाढीसह 47,125 च्या पातळीवर बंद झाला. तर मिडकॅप निर्देशांक 238 अंकांच्या वाढीसह 48,076 च्या पातळीवर बंद झाला. सरकारी आणि फार्मा कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. निफ्टीच्या 50 पैकी 44 समभाग हिरव्या रंगात बंद झाले.
बजाजच्या शेअर्समध्ये मोठी वाढ –
बजाज हाऊसिंग फायनान्सच्या (Bajaj Housing Finance) आयपीओच्या (IPO) वृत्तानंतर बजाज फायनान्स (Bajaj Finance) आणि बजाज फिनसर्व्ह (Bajaj Finserv) वाढीसह बंद झाले. ग्रासिम (Grasim), एल अँड टी (L&T), अदानी पोर्ट्स (Adani Ports), सन फार्मा (Sun Pharma) आणि मारुती सुझुकी (Maruti Suzuki) विक्रमी पातळीवर बंद झाले. हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp), आयशर मोटर्स (Eicher Motors) मार्चच्या विक्रीच्या आकड्यांपूर्वी वाढीसह बंद झाले. तर बजाज ऑटो (Bajaj Auto) घसरणीसह बंद झाला.
श्रीराम फायनान्स (Shriram Finance) निफ्टीमध्ये समावेश झाल्याच्या पहिल्या दिवशी आज लाल रंगात बंद झाला. नवीन एमडी आणि सीईओच्या नियुक्तीनंतर, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये (Bank of Maharashtra) 5% वाढ झाली आहे. पॉझिटिव्ह ब्रोकरेज नोट्सच्या आधारे एजिस लॉजिस्टिक्स (Aegis Logistics), पीजी इलेक्ट्रोप्लास्टमध्ये (PG Electroplast) खरेदी दिसून आली.