नवी दिल्ली – शुक्रवारी सकाळी 7.45 च्या सुमारास बीएसएफच्या जवानांना अमृतसर सेक्टरमधील बीओपी पुलमोरन येथे पाक ड्रोन घुसखोरी करताना दिसला. यावर सतर्क जवानांनी गोळीबार सुरू केला आणि ड्रोन खाली पाडले. यानंतर जवानांची तो ड्रोन जप्त केला.
पंजाब बॉर्डर जवळ गेल्या काही दिवसांमध्ये विविध प्रकराची घुसखोरी सुरु आहे. त्यामुळे या सीमाभागातील भारतीय जवान नेहमीच सतर्क असतात. यामुळेच पंजाबमधील अमृतसर सेक्टरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना मोठे यश मिळाले आहे. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी बीओपी पुलमोरान येथे घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी ड्रोनला खाली पाडले. यानंतर जवानांनी तात्काळ या परिसरात सर्च ऑपरेशन सुरु केल्याचे देखील दिसून आले.
शुक्रवारी सकाळी ७.४५ वाजता बीएसएफच्या जवानांनी अमृतसर सेक्टरमध्ये ड्रोनने घुसखोरी होताना दिसून आल्यानंतर जवानांनी कारवाई केल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे. ड्रोन खाली पाडल्यानंतरचे काही फोटो देखील समोर आले आहेत.
Today at about 7.45 am, BSF troops detected a Pak drone intrusion in the AOR of BOP Pulmoran, 22 Battalion, Amritsar sector, Punjab and shot it down. The drone has been seized. Search operation in progress. Further details awaited pic.twitter.com/cFH3FkucVl
— ANI (@ANI) December 23, 2022
गेल्या तीन दिवसातील ही दुसरी घटना
अमृतसर सेक्टरमध्ये गेल्या तीन दिवसांतील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी मंगळवारी देखील अशीच ड्रोन घुसखोरीची घटना समोर आली होती. ही घुसखोरी पाककडून होत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. गेल्या दोन महिन्यांत सीमा सुरक्षा दलाने अमृतसर परिसरात चार ड्रोन पाडले आहेत.सतत होणाऱ्या ड्रोन घुसखोरीमुळे सीमाभागातील जवान नेहमी अलर्ट मोडवर राहत असल्याचे स्पष्ट झाले.